सुरेश रैनाचा विक्रम, कोहलीला टाकलं मागे

टी-20 क्रिकेटमध्ये सुरेश रैनासाठी गेले काही दिवस चांगले जात आहेत. 

Updated: Apr 22, 2018, 07:26 PM IST
सुरेश रैनाचा विक्रम, कोहलीला टाकलं मागे title=

हैदराबाद : टी-20 क्रिकेटमध्ये सुरेश रैनासाठी गेले काही दिवस चांगले जात आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रैनानं भारतीय टीममध्ये पुनरागमन केलं. या दौऱ्यामध्ये रैनानं चांगलं प्रदर्शन केलं.  आयपीएलमध्येही रैनाची बॅट तळपत आहे. आयपीएलमध्ये रैना हा सर्वाधिक रन बनवणारा खेळाडू होता. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीनं रैनाचा हा विक्रम मोडला होता. आता पुन्हा एकदा रैना विराट कोहलीच्या पुढे गेला आहे.  सुरेश रैना आता पुन्हा एकदा आयपीएल इतिहासात सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये रैनानं नाबाद ५३ रनची खेळी केली.

सुरेश रैना सगळ्यांच्या पुढे

सुरेश रैनानं आत्तापर्यंत १६५ आयपीएल मॅच खेळल्या आहेत. १६१ इनिंगमध्ये रैनानं ४,६५८ रन केल्या आहेत. यामध्ये ३२ अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे. तर विराटनं १४६ इनिंगमध्ये ४,६४९ रन केल्या आहेत. कोहलीनं आयपीएलमध्ये ३२ अर्धशतकं आणि ४ शतकं केली आहेत.