डब्लूडब्लूई रेसलर किवताच्या सन्मानार्थ शाळेने लॉन्च केले चांदीचे नाणे

सुप्रीम सीनियर सेकेंडरी स्कूलच्या वतीने डब्लूडब्लूईल्यू रेसलर कविता हिला एक अनोखा सन्मान देण्यात आला. सेकेंडरी स्कूलने कविताचा सन्मान करण्यासाठी चांदीचे नाणे लॉन्च केले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 15, 2018, 11:25 PM IST
डब्लूडब्लूई रेसलर किवताच्या सन्मानार्थ शाळेने लॉन्च केले चांदीचे नाणे title=

नवी दिल्ली : सुप्रीम सीनियर सेकेंडरी स्कूलच्या वतीने डब्लूडब्लूईल्यू रेसलर कविता हिला एक अनोखा सन्मान देण्यात आला. सेकेंडरी स्कूलने कविताचा सन्मान करण्यासाठी चांदीचे नाणे लॉन्च केले आहे.

सुप्रीम सीनियर सेकेंडरी स्कूलचे प्रमुख राजेश गोयल यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. या वेळी शाळेच्या वतीने महिला सशक्तीकरण मोहिमही सुरू करण्यात आली. कविताने या मोहिमेचा शुभारंभ केला. 

अशा उपक्रमातून महिला आणि विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वासाची भावना निर्माण होते. कविताचे कार्य हे अनेकांना प्रेरणा देणारे आहे. महिला रेसलींगमध्ये कविता जे काम करते आहे ते पाहून इतरांना नक्कीच प्रेरणा मिळेल. पण तिच्या कार्याची दखल म्हणून आम्ही चांदिचे नाणे लॉन्च करत आहोत, अशी भावना गोयल यांनी या वेळी व्यक्त केली.