मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने धडाकेबाज कामगिरी करत विराट कोहलीला मागे टाकलले आहे. आयसीसी क्रमवारीत ९०४ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा स्मिथ पहिल्या स्थानावर आहे. तर ९०३ गुणांसह विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आयसीसी कसोटी क्रमवारीत करिअरच्या सर्वोत्तम स्थानावर झेप मारली आहे.
महेंद्रसिंग धोनीचा २७ कसोटी विजयाचा विक्रम मोडीत काढत सर्वात यशस्वी कर्णधार होण्याचा मान विराट कोहलीने मिळवला आहे. विराट कोहलीच्या नेृत्वातील भारतीय संघाने कसोटी मालिकेत वेस्टइंडीजचा दारूण पराभव केला. टी-२० आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारताने विडिंजच्या संघावर कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व मिळवले. या विजयामुळे कोहली टीम इंडियाकडून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार ठरला आहे.
Feels great to get win our first series in the Test Championship.
Thorough performance by the team overall, blessed to be a part of this special unit. pic.twitter.com/83tb8LoJNJ— Virat Kohli (@imVkohli) September 3, 2019
स्मिथ हा डिसेंबर २०१५ पासून पहिल्या स्थानावर होता. ऑगस्ट २०१८ मध्ये जेव्हा स्मिथने न्यूझीलंडच्या बॉल-टेंपरिंग (चेंडू कुरतडल्याप्रकरणी) प्रकरणानंतर त्यावर बंदी आणली होती. तेव्हा करिअरच्या अव्वल स्थानावर असणाऱ्या कोहलीने त्याला क्रमवारीत मागे टाकले होते. त्याच्यावरील बंदी मागे घेतल्यानंतर स्मिथने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी खेळताना त्याने द्विशक ठोकले. तर दुसऱ्या कसोटीत ९२ धावा केल्या. त्यानंतर त्याच्या गुणांत वाढ झाली.
स्मिथची कामगिरी - एकूण ६६ सामने, धावा ६५७७, शतक २५ आणि सरासरी ६३.२४ तर विराटची कामगिरी - एकूण ७९ सामने, धावा ६७४९, शतक २५ आणि सरासरी ५३.१४