श्रीलंकन खेळाडूंनी मारला झिंग्यांवर ताव...

  उपराजधानीत शुक्रवारपासून सुरु होत असलेल्या दुस-या टेस्टसाठी आलेल्या श्रीलंकन टीमने बुधवारी रात्री एका हॉटेलमध्ये झिंग्यांवर चांगलाच ताव मारला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 22, 2017, 11:23 PM IST
 श्रीलंकन खेळाडूंनी मारला झिंग्यांवर ताव...  title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर :  उपराजधानीत शुक्रवारपासून सुरु होत असलेल्या दुस-या टेस्टसाठी आलेल्या श्रीलंकन टीमने बुधवारी रात्री एका हॉटेलमध्ये झिंग्यांवर चांगलाच ताव मारला.

वर्धा मार्गावरील  10 डाऊनिंग स्ट्रीट हॉटेलमध्ये श्रीलंकन क्रिकेटपटूंनी शाकाहारी जेवणाशिवाय चायनीज व कॉंटिनेंटल डिशेसचीही चव चाखताना जेवणाची स्तुतीदेखील केली. 

कुठे गेले जेवायला... 

जामठा मैदानावर सरावा दरम्यान आज घाम गाळल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास लंकन टीम कॅप्टन दिनेश चंडीमल, एंजेलो मॅथ्यूजसह सर्व खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ लक्‍झरी बसने पोलिसांच्या ताफ्यासह वर्धा मार्गावरील  10 डाऊनिंग स्ट्रीट हॉटेलमध्ये दाखल झालेत. 

झिंग्यावर मारला ताव...

तिथे आवडीनुसार विविध डिशेसचा आस्वाद घेताना झिंग्यावर मात्र चांगलाच ताव मारला.: झिंग्यांची ऑर्डरही रिपीट केलीय. याशिवाय चायनीज, कॉंटिनेंटल व शाकाहारी जेवणही घेतले, असे झी मीडियाला हॉटेलचे मालक वैभव सपकाळ यांनी सांगितले. 

अजून काय खाल्ले... 

तसेच काहींनी नुडल्स, बटर चिकन, फिश, थाई करी, व्हेज माचो, फ्राईड राईसचीही त्यांनी मागणी केली. श्रीलंकेचे खेळाडू जवळपास दोन तास हॉटेलमध्ये होते.दरम्यान लंकन टीमचा रोशेन सिव्हा मात्र अलर्जीमुळे हॉटेलमधून लवकर बाहेर पडला.

 त्यानंतर थोड्यावेळाने जेवण आटोपल्यानंतर रात्री नऊ वाजता उर्वरित सर्व जण मुक्‍कामी असलेल्या हॉटेलकडे निघून गेले.