India vs Sri Lanka : भारताविरुद्ध श्रीलंकाचा संघ जाहीर, 'या' खेळाडूला तडकाफडकी केलं कॅप्टन

India vs Sri Lanka Series: टीम इंडियाला श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी आता श्रीलंकेने टी-ट्वेंटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. चरित असलंका (Charith Asalanka) श्रीलंकेचा कॅप्टन असेल.

सौरभ तळेकर | Updated: Jul 23, 2024, 04:38 PM IST
India vs Sri Lanka : भारताविरुद्ध श्रीलंकाचा संघ जाहीर, 'या' खेळाडूला तडकाफडकी केलं कॅप्टन title=
India vs Sri Lanka Series

Sri Lanka Squad T20Is Against India: श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया 3 टी-ट्वेंटी आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. एकीकडे बीसीसीआयने वेळापत्रक (India vs Sri Lanka series Schedule) जाहीर केलं तर दुसरीकडे श्रीलंकेने देखील संघाची घोषणा केली आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर वानिंदू हसरंगाने कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. मात्र आता श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने चरित असलंकाची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. श्रीलंकेने 16 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. 

चरिथ असलंका संघाचा कॅप्टन असेल तर पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल या फलंदाजांवर श्रीलंकेची मदार असेल. तर वनिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, चामिंदू विक्रमसिंगे, मथिशा पाथिराना, नुवान थुसारा, दुनिथ वेल्लालागे, दुश्मंता चामिरा या गोलंदाजांच्या कामगिरीवर देखील लक्ष असणार आहे. 

टी-ट्वेंटी मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ - चरिथ असलंका (C), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, चामिंदू विक्रमसिंगे, मथिशा पाथिराना, नुवान थुसारा, दुनिथ वेल्लालागे, दुश्मंता चामिरा, बिनुरा फर्नांडो. 

टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ - सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोनी, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 27 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
दुसरा सामना, 28 जुलै, संध्याकाळी 7 वाजता
तिसरा सामना, 30 जुलै, संध्याकाळी 7 वाजता