IPL 2020 : कोलकाताने हैद्राबादला दिलं १६४ धावांच टार्गेट

कोलकाता नाइट रायडर्स आणि सनराइजर्स हैद्राबादमध्ये आतापर्यंत १८ सामने झालेत

Updated: Oct 18, 2020, 05:59 PM IST
IPL 2020 : कोलकाताने हैद्राबादला दिलं १६४ धावांच टार्गेट  title=

मुंबई : कोलकाता नाइट रायडर्स आणि सनराइजर्स हैद्राबाद यांचया आयपीएलचा सामना अबुधाबीत होत आहे. हैदराबादविरूद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने १६० पार मजल मारली. कोलकाताचे आजी-माजी कर्णधार दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन या जोडीने शेवटच्या काही षटकांत दमदार फटकेबाजी करत संघाला १६३ धावांचा पल्ला गाठून दिला. या दोघांची अर्धशतकी भागीदारी कोलकातासाठी महत्त्वाची ठरली.

 कोलकाता नाइट रायडर्स आणि सनराइजर्स हैद्राबादमध्ये आतापर्यंत १८ सामने झाले आहे. कोलकाता ११ आणि हैद्राबादने ७ सामने जिंकले आहेत. या सिझनमध्ये कोलकाताने हैद्राबादच्या विरुद्ध २६ सप्टेंबरमध्ये ७ विकेट घेऊन विजय मिळवला. 

कोलकाताने पहिली फलंदाजी करत २० ओव्हरमध्ये पाच विकेट गमावून १६३ धावा केल्या. कोलकाताकरता शुभमन गिलने ३६ धावा केल्या. पाचव्या विकेट करता दिनेश कार्तिकसोबत ५८ धावा करणारे कोलकाताचे कॅप्टन इयॉन मोर्गनने २३ गोलंदाजीत ३४ आणि दिनेश कार्तिकने १४ गोलंदाजीत २९ धावा केल्या.