हैदराबाद-गुजरात आमनेसामने, विजयाचा 'चौकार' मारण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्या सज्ज

ऑरेंज जर्सी विरुद्ध सामना जिंकण्यासाठी हार्दिक पांड्या करणार टीममध्ये बदल?

Updated: Apr 11, 2022, 03:12 PM IST
हैदराबाद-गुजरात आमनेसामने, विजयाचा 'चौकार' मारण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्या सज्ज   title=

मुंबई: आयपीएलमध्ये 21 वा सामना हैदराबाद विरुद्ध गुजरात होत आहे. गुजरात टीम आतापर्यंत एकही सामना पराभूत झाले नाहीत. तर हैदराबाद टीमला एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. दोन्ही टीममध्ये चुरशीची लढत होणार आहे. 

गुजरातने लखनऊला 5 विकेट्सनी पराभूत केलं. त्यानंतर दिल्ली आणि पंजाबवर विजय मिळवला. आता कॅप्टन हार्दिक पांड्या विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज आहे. गुजरातला हा सामना जिंकून पॉईंट टेबलमध्ये पहिलं स्थान मिळवायचं आहे. 

गुजरातची टीम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या टीममध्ये कोणते बदल करण्याची जोखीम घेणार नाही. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने बॅटिंग ऑर्डरमध्ये कोणताही बदल करू नये. हैदराबाद टीमला एक सामना जिंकण्यात यश मिळालं आहे. त्यामुळे तेच कायम ठेवावं अशी आशा चाहत्यांना आहे. 

गुजरात टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), मॅथ्यू वेड, शुभमन गिल, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, रशीद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, दर्शन नालकंडे.

हैदराबाद टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, केन विलियमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, एडेन मार्क्रम, शशांक सिंह, वाशिंगटन सुंदर, मार्को जनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक