गोल्ड मेडल विजेती कांचनमालाच्या स्वागताकडे अधिकाऱ्यांची पाठ

आंतरराष्ट्रीय पातलीवर गोल्ड मेडल पटकावून मायदेशी परतलेली पॅरा स्विमर कांचनमालाच्या स्वागताला एकही क्रीडा अधिकारी उपस्थित नव्हता.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 11, 2017, 01:41 PM IST
गोल्ड मेडल विजेती कांचनमालाच्या स्वागताकडे अधिकाऱ्यांची पाठ title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय पातलीवर गोल्ड मेडल पटकावून मायदेशी परतलेली पॅरा स्विमर कांचनमालाच्या स्वागताला एकही क्रीडा अधिकारी उपस्थित नव्हता.

क्रीडा खात्याची उदासिनता झी 24 तासनं पुढे आणलं. या वृत्ताची क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कांचनमालाचं अभिनंदन करत तिला 15 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. 

नागपूरच्या कांचनमाला पांडे हिनं मेक्सिको येथील पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी कांचनमाला भारताची पहिली जलतरणपटू ठरली असून तिची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. कांचनमालानं एस-११ श्रेणीत २०० मीटर इंडीव्युजल मिडले प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.  

कांचनमाला ही भारताकडून पात्र ठरलेली एकमेव महिला जलतरणपटू आहे. या स्पर्धेतील इतर प्रकारात तिला थोडक्यात अपयश आलं. कांचनमाला ही जन्मत: अंध असून ती मूळची अमरावतीची आहे. तिनं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात जलतरणाचे धडे गिरवले आहेत. तिनं जवळपास १० हून अधिकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व केलं असून दहाहून अधिक सुवर्णपदक आणि पाच रौप्य पदकांना तिनं गवसणी घातली आहे.