दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 21, 2018, 09:29 PM IST
दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला  title=

सेंच्युरिअन : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टी-20मध्ये विजय मिळल्यानंतर आता दुसरी टी-20 जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरत आहे.

या मॅचमध्ये भारतीय टीममध्ये बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहऐवजी शार्दुल ठाकूरला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहच्या ओटीपोटाला दुखापत झाल्यामुळे तो या मॅचमध्ये खेळू शकणार नाही.

अशी आहे भारतीय टीम

रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, विराट कोहली, मनिष पांडे, एम.एस.धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा