केपटाऊन : भारत आणि साऊथ आफ्रिकेदरम्यान खेळल्या जाणाऱ्या टेस्ट सिरीजदरम्यान यजमान संघाला मोठा झटका बसला आहे.
केपटाऊनमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने मोठी लीड मिळवून देत आफ्रिकेची स्वप्न धूळीस मिळवली.
तर यजमान संघाचा फास्ट बॉलर डेल स्टेन जखमी झाल्याने पूर्ण सिरीजमधून बाहेर गेला आहे.
स्टेनला शनिवारी बॉलिंग करताना उजव्या पायाला इजा पोहोचली. त्यानंतर तो आपली ओव्हर पूर्ण करु शकला नाही. लंगडतच तो मैदानाच्या बाहेर गेला.
फिलंडरने शिल्लक तीन बॉल टाकून ओव्हर पूर्ण केली.
स्टेनच्या दुखापतीचे कारण शोधण्यासाठी पायाला स्कॅन केले गेले. त्यानंत आलेला रिपोर्ट हा स्टेनसाठी चिंताजनक होता.
हे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला संपूर्ण सिरीजमध्ये बाहेर बसावे लागणार आहे.