आशिष नेहराबाबत माजी कर्णधार गांगुलीचा मोठा खुलासा

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. एक नोव्हेंबरला फिरोजशाह कोटला स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध नेहरा अखेरचा सामना खेळला. त्यानंतर त्याने निवृत्ती घेतली.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 4, 2017, 06:18 PM IST
आशिष नेहराबाबत माजी कर्णधार गांगुलीचा मोठा खुलासा title=

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. एक नोव्हेंबरला फिरोजशाह कोटला स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध नेहरा अखेरचा सामना खेळला. त्यानंतर त्याने निवृत्ती घेतली.

नेहराने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी आपापल्या पद्धतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. या दरम्यानच आशिष नेहराबाबत माजी कर्णधार सौरव गांगुलीने मोठा खुलासा केलाय.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला, मला वाटतं नेहराचे बेस्ट फ्रेंड फिजिओ होते. आपल्या पत्नीपेक्षा अधिक वेळ त्याने फिजिओसोबत घालवला. दुखापतींमुळे त्याला अधिक काळ क्रिकेट खेळता आले नाही. मात्र त्याची कामगिरी नेहमीच चांगली राहिली. दुखापतीनंतरही तो क्रिकेट खेळत राहिला. त्याने कधी हार मानली नाही. 

गांगुली पुढे म्हणाला, नेहराच्या निवृत्तीचा सोहळा सन्मानजनक होता. घरच्या मैदानावर क्रिकेटला अलविदा म्हणण्याची संधी फार कमी खेळाडूंना मिळते. याआधी महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरला ही संधी मिळाली होती. आता या यादीत आशिष नेहराचेही नाव सामील झालेय. अखेरच्या सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली.