अंतिम 11 मध्ये जागा मिळवण्यासाठी सिराजची या दिग्गज बॉलरसोबत स्पर्धा

टीम इंडियात फास्ट बॉलर म्हणून कोणाला संधी मिळणार?

Updated: Feb 3, 2021, 08:58 AM IST
अंतिम 11 मध्ये जागा मिळवण्यासाठी सिराजची या दिग्गज बॉलरसोबत स्पर्धा title=

मुंबई : बर्‍याच खेळाडूंच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या अंतिम-11 मध्ये टीम इंडियापुढे खूप पर्याय नसतील. पण वेगवान गोलंदाजासाठी अनुभवी इशांत शर्मा आणि युवा वेगवान गोलंदाज मुहम्मद सिराज यांच्यात चुरशीची झुंज पाहायला मिळू शकते. जसप्रीत बुमराह निश्चित खेळणार असल्याने इशांत आणि सिराज यांच्यात वेगवान गोलंदाजांसाठी सामना दिसू शकतो.

भारतात स्पिनर्सला अधिक मदत मिळेल. त्यामुळे जास्त फास्ट बॉलर्स संघात खेळवणार का याबाबत शंका आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि कर्णधार विराट कोहली हे वेगवान बॉलर म्हणून जसप्रीत बुमराहसोबत कोणत्या खेळाडूला संधी देतात हे पाहावं लागेल. इशांत जवळजवळ एक वर्षापासून रेड बॉल क्रिकेट खेळलेला नाही, तर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर सिराज चांगला फॉर्मात होता, तेथे त्याने ब्रिस्बेन येथे एका डावात पाच विकेटसह तीन कसोटी सामन्यांमध्ये एकूण 13 बळी घेतले होते.

इशांत नुकताच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला आहे. तेथे त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या चार सामन्यांमध्ये एकूण 14.1 ओव्हर टाकली होती. दरम्यान, अष्टपैलू हार्दिक पांड्याचा क्वारंटाईन कालावधी बुधवारी सकाळी संपेल. त्यानंतर तो सरावासाठी संघात सहभागी होईल. बर्‍याच दिवसानंतर कसोटी संघाचा सदस्य झालेला पांड्या वैयक्तिक कारणामुळे एक दिवस उशिरा संघात सामील होईल. पांड्याला पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकली नसली, तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमुळे त्याच्यावर गोलंदाजीची जबाबादारी येऊ शकते.

पांड्याला हाडाचा त्रास झाल्यामुळे बॉलिंग न करण्याचा सल्ला दिला गेला होता. पण त्याने जेव्हा संघाला आवश्यकता होती. तेव्हा बॉल हातात घेतला आणि काही ओव्हरर्स टाकले आहेत.