video : इतक्या जोरात सिक्स मारला की कारची काचच फुटली

झिम्बाब्वेचा क्रिकेटर सिकंदर राजाने ६६ चेंडूत १२३ धावांची धमाकेदार खेळी आणि ४८ धावांत ३ विकेट घेत संघाला शानदार विजय मिळवून दिला. 

Updated: Mar 5, 2018, 04:28 PM IST
video : इतक्या जोरात सिक्स मारला की कारची काचच फुटली  title=

नवी दिल्ली : झिम्बाब्वेचा क्रिकेटर सिकंदर राजाने ६६ चेंडूत १२३ धावांची धमाकेदार खेळी आणि ४८ धावांत ३ विकेट घेत संघाला शानदार विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर आयसीसी वर्ल्डकप क्वालिफायर्स ग्रुप बीमध्ये नेपाळवर ११६ धावांनी विजय मिळवला.

टॉस जिंकून झिम्बाब्वने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ६ विकेट मिळवत ३८० धावा केल्या. त्यानंतरन नेपाळला २६४ धावांवर रोखण्यात झिम्बाब्वेला यश मिळाले. 

या सामन्यात सिकंदरा रझाने शानदार कामगिरी केली. त्याने ऑलराऊंडर खेळ केला. आपले शतक पूर्ण करण्यासाठी सिकंदरने षटकार ठोकला. हा षटकार इतका जोरदार होता की चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला आणि उभ्या असलेल्या कारची काचच फुटली. 

 

शानदार फलंदाजी करण्यासोबतच रझाने गोलंदाजीतही आपली छाप सोडली. रझाने ४८ धावा करताना तीन विकेट मिळवल्या.