Shubman Gill Dance : लाईव्ह सामन्यात अचानक नाचू लागला शुभमन; पाहा नेमकं काय घडलं?

Shubman Gill Dance : बुधवार पासून डोमिनिकामध्ये पहिल्या टेस्टला ( IND vs WI First Test ) सुरुवात झाली असून पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व दिसून आलं. फिल्डींग करत असताना शुभमन गिलचा ( Shubman Gill ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

सुरभि जगदीश | Updated: Jul 13, 2023, 06:12 PM IST
Shubman Gill Dance : लाईव्ह सामन्यात अचानक नाचू लागला शुभमन; पाहा नेमकं काय घडलं? title=

Shubman Gill Dance : वेस्ट इंडिज विरूद्ध भारत (  IND vs WI) यांच्या दौऱ्यातील टेस्ट सिरीजला सुरुवात झाली आहे. बुधवार पासून डोमिनिकामध्ये पहिल्या टेस्टला ( IND vs WI First Test ) सुरुवात झाली असून पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व दिसून आलं. अशातच टीम इंडिया फिल्डींग करत असताना शुभमन गिलचा ( Shubman Gill ) एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही शुभमन गिलचे उत्तम डान्स ( Shubman Gill Dance ) मूव्ह्स पहायला मिळतायत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

मैदानावर अचानक नाचू लागला शुभमन

टीम इंडियाचा फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill ) आयपीएलपासून उत्तम फॉर्ममध्ये आहेत. मैदानावर यापूर्वी चाहत्यांनी त्याला सिरीयस मूडमध्ये पाहिलं आहे. मात्र वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात गिलचा ( Shubman Gill ) एक वेगळाच अंदाज पहायला मिळाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने विंडीजचे 9 विकेट्स काढले होके. यावेळी मैदानावर शेवटची जोडी फलंदाजी करत होती. अशातच गाणं वाजू लागलं आणि सिली पॉईंटवर फिल्डींगला उभा असलेला शुभमन ( Shubman Gill ) नाचायला लागला. 

चाहत्यांना आवडले गिलचे डान्स मूव्ह्स

गिलचे हे उत्तम डान्स मूव्ह्स पाहून स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकही भारावले. मुख्य म्हणजे विराटच्या ( Virat Kohli ) समोरच गिल डान्स करताना दिसला. भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहलीही ( Virat Kohli ) लाइव्ह मॅचमध्ये अनेकदा भांगडा करताना दिसला होता. 

ओपनिंग करणार नाही शुभमन

शुभमन गिल विंडीज दौऱ्यावरील टेस्ट सामन्यात ओपनिंग करायला उतरला नाही. गिल हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. पहिल्या टेस्ट सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने सलामीची जबाबदारी स्वीकारली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 80 रन्स केलेत

वेस्ट इंडिजची संपूर्ण टीम 150 रन्सवर गारद झाली. वेस्ट इंडिजकडून अॅलिक अथनागेने सर्वाधिक 47 रन्स केले. भारताकडून आर अश्विनने 5 विकेट्स घेतल्या तर रविंद्र जडेजाच्या खात्यात 3 विकेट्स जमा झाल्या. पहिल्या दिवसावर यावेळी टीम इंडियाचं वर्चस्व दिसून आलं.