Shreyas Iyer Mumbai Ranji Trophy Team : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन टी-ट्वेंटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या या संघात वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाका करणाऱ्या श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) स्थान मिळालं नाही. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. आगामी इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सामन्यात (IND vs ENG Test) श्रेयसला स्थान मिळेल की नाही? असा सवाल उपस्थित होत असतानाच आता श्रेयस अय्यरने मोठा निर्णय घेतला असून श्रेयसने पुन्हा बेसिकवर काम करण्याचा निश्चय केला आहे.
श्रेयस अय्यर मुंबईच्या संघात सामील
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरचा मंगळवारी 12 ते 15 जानेवारी दरम्यान आंध्रविरुद्ध होणाऱ्या आगामी रणजी करंडक सामन्यासाठी (Mumbai Ranji Trophy Team) मुंबई संघात समावेश करण्यात आला. अय्यरने मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खानची जागा घेतली, ज्याची अहमदाबाद येथे इंग्लंड अ विरुद्धच्या मालिकेसाठी भारत अ संघात निवड करण्यात आली आहे. तर शिवम दुबे देखील अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार असल्याने मुंबईला मोठा झटका बसलाय. अशातच आता श्रेयसच्या कमबॅकमुळे मुंबईला फायदा होण्याची शक्यता आहे.
तब्बल 41 वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबई संघाने यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यात बिहारचा एक डाव आणि 51 धावांनी पराभव केला होता. अशातच श्रेयस संघात आल्याने त्याला आणखी बेसिकवर काम करता येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरूवात 25 जानेवारीपासून होणार आहे. यासाठी लवकर टीम इंडियाची घोषणा होईल. श्रेयसने रणजीमध्ये चमकदार कामगिरी केली तर त्याला इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकते.
मुंबईचा रणजी संघ :
अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, जय बिस्ता, भुपेन लालवानी, अमोघ भटकळ, सुवेद पारकर, प्रसाद पवार, हार्दिक तामोरे, शम्स मुल्लाणी, तनुष कोटिआन, अथर्व अंकोलकर, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉयस्टन दिआस, सिल्वेस्टर डिसोझा.