मुंबई : अॅशेज सीरीजच्या पहिल्या टेस्ट सामन्यांमध्ये ऑस्ट्रलियाचा ओपनर डेविड वॉर्नरला स्थानिक फॅन्सने सँडपेपर दाखवले. बर्मिंघममध्ये एजबेस्टनमध्ये सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात वॉर्नरने लवकर विकेट गमवली. पहिल्या इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये फक्त 2 रनच्या स्कोरवर तो आऊट झाला.
आउट झाल्यानंतर मैदानावरील प्रेक्षकांनी त्याला सँडपेपर दाखवले. इंग्लंड क्रिकेटच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट यांनी टीममध्ये पुन्हा संधी मिळाली आहे. मागच्या वर्षी बॉल कुरतडल्या प्रकरणी हे तिघेही दोषी ठरले होते. त्यामुळे त्यांच्यावर 1 वर्षाची बंदी घालण्यात आली होती. तर बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी होती.
YEEESSS @StuartBroad8!! GET IN!!
Scorecard/Clips: https://t.co/1J6wGj3xwv pic.twitter.com/UaYWyvOZec
— England Cricket (@englandcricket) August 1, 2019
सँडपेपर प्रकरणात दोषी ठरल्यामुळे वर्ल्डकप-2019 दरम्यान देखील वॉर्नर आणि स्मिथला असंच डिवचण्याचं काम झालं होतं. एका सामन्यात तर 2 जणांनी चक्क त्यांना डिवचण्यासाठी तशा प्रकारचा पोशाख परिधान केला होता.