Shoaib Malik: '...मी ते कधीच विसरू शकणार नाही', LIVE शोमध्ये शोएब मलिक ढसाढसा रडला!

Shoaib malik crying on live show : व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शोएब मलिक एका कार्यक्रमात उपस्थित होता. विषय होता. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल (T20 World Cup Final Eng vs Pak)

Updated: Nov 13, 2022, 06:18 PM IST
Shoaib Malik: '...मी ते कधीच विसरू शकणार नाही', LIVE शोमध्ये शोएब मलिक ढसाढसा रडला! title=
Shoaib malik crying on live show

Shoaib Malik Emotional : पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik ) आणि भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) यांच्यामधील नात्यातील दुराव्याची एकच चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाची (Divorce) चर्चा होती. अशातच आता शोएब मलिकचा (Shoaib Malik Emotional Video) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये तो चक्क भावूक झाल्याचं पहायला मिळतंय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शोएब मलिक एका कार्यक्रमात उपस्थित होता. विषय होता. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल (T20 World Cup Final Eng vs Pak)... या कार्यक्रमात वकार युनूस, वसीम अक्रम, मिसबाह-उल-हक आणि शोएब मलिक यांसारखे दिग्गज खेळाडू उपस्थित होते. त्यावेळी लाईव्ह शोमध्ये शोएब ठसाठसा रडला.

आणखी वाचा - T20 World Cup Final ENG vs PAK: बटलरची चाल काम करून गेली, शेवटी काढला 'तो' हुकमी एक्का!

युनूस खानच्या (Yunas Khan) नेतृत्वात पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत करत पहिले विजेतेपद जिंकले होते. त्यावेळी मलिकही त्या संघाचा भाग होता. त्यावर प्रश्न विचारल्यानंतर मलिकला अश्रू अनावर झाले आणि तो भावुक झाला. त्यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी आल्याचं देखील पहायला मिळालं आहे.

पाहा व्हिडीओ - 

दरम्यान, जेव्हा आम्ही 2009 मध्ये T20 वर्ल्ड कप (Pakistan T20 World Cup) जिंकलो, त्यावेळी मी नवीन खेळाडू होतो. कॅप्टन युनूस खान यांनी मला बोलावलं आणि म्हटलं की, ट्रॉफी तू उचलशील. तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता, असं मलिक यावेळी म्हणाला.