Shoaib Akhtar ची भविष्यवाणी ठरली खरी! तिसऱ्या पराभवानंतर कॅप्टन बाबरला दिला 'हा' टोकाचा सल्ला

Shoaib Akhtar On Babar Azam :  अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने संयमी खेळी करून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता माजी गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम याला कॅप्टन्सी सोडण्याचा सल्ला दिला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Oct 24, 2023, 05:02 PM IST
Shoaib Akhtar ची भविष्यवाणी ठरली खरी! तिसऱ्या पराभवानंतर कॅप्टन बाबरला दिला 'हा' टोकाचा सल्ला title=
Shoaib Akhtar, Babar Azam

PAK vs AFG World Cup 2023 : पाकिस्तानच्या वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात लाजीरवाणा पराभव यंदा पहायला मिळाला. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने संयमी खेळी करून पाकिस्तानचा धुव्वा उडवला अन् पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) स्वप्न अंधुक केलं. या पराभवानंतर पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे पाकिस्तानचे माजी खेळाडू देखील संघातील खेळाडूंवर आसूड ओढताना दिसत आहे. अशातच माजी गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याला कॅप्टन्सी सोडण्याचा सल्ला दिला आहे.

शोएब अख्तर त्याच्या निर्भय आणि सरळ बोलण्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. या स्पर्धेतील पाकिस्तानचा हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे, असं अख्तर म्हणाला. मला याचीच भीती वाटत होती. आजच्या खेळाबद्दल सांगण्यासाठी माझ्याकडचे शब्दच संपले आहेत, असं शोएब अख्तर याने झी मीडियाशी बोलताना म्हटलं आहे. त्यावेळी अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर देखील निशाणा लगावला. तुम्ही सरासरी दर्जाच्या लोकांना पाठिंबा दिल्यावर तुम्हाला निकाल देखील सरासरीच लागणार, असं अख्तर म्हणतो.

मला एक गोष्ट सांगा की, पाकिस्तान संघात कोणतातरी तरुणांना प्रेरणादायी क्रिकेटपटू आहे का? मी वकार युनूस, वसीम अक्रम, इम्रान खान, स्टीव्ह वॉ, ऍलन बॉर्डर, विवियन रिचर्ड्स यांना पाहिले आहे. पण आत्ताची पिढी कोणाकडे बघते? आजचा खेळ पाहून मला खूप वाट वाटलं. माझं हृदय तुटलंय, असं बाबर म्हणाला. त्यावेळी त्याने बाबरला कॅप्टन्सी सोडण्याचा सल्ला देखील दिलाय.

जर मी बाबरसोबत असतो, तर आताच म्हणालो असतो की, कर्णधारपद सोड... अफगाणिस्तानचा पराभव ही सर्वात वाईट गोष्ट घडली आहे. तुम्हाला आगामी चार सामने खेळायचे आहेत आणि हे सर्व सामने जिंकायचे आहेत, असंही अख्तर म्हणतो. काही दिवसापूर्वी म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर अफगाणिस्तानसोबत अशी परिस्थिती होऊ शकते, अशी भविष्यवाणी अख्तरने केली होती.

पाकिस्तानची परिस्थिती वाईट

पाकिस्तानच्या संघाला मागील तिन्ही सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे पाच सामन्यात फक्त 2 विजयाच्या 4 गुणांसह पाकिस्तानचा संघ अंकतालिकेत पाचव्या स्थानी आहे. सध्या पाकिस्तानचा रनरेट -0.400 असा आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचं आख्खं गणित बिघडलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.