खलीनं घेतली शिवराजसिंग चौहान यांची भेट

डब्ल्यूडब्ल्यूईचा चॅम्पियन आणि भारताचं प्रतिनिधीत्व करणारा दलीप सिंह राणा उर्फ द ग्रेट खलीनं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची भेट घेतली आहे.

Updated: Dec 12, 2017, 09:14 PM IST
खलीनं घेतली शिवराजसिंग चौहान यांची भेट  title=

भोपाळ : डब्ल्यूडब्ल्यूईचा चॅम्पियन आणि भारताचं प्रतिनिधीत्व करणारा दलीप सिंह राणा उर्फ द ग्रेट खलीनं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. मध्य प्रदेशमध्ये कुस्तीला चालना देण्यासाठी खलीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीही खलीला कुस्तीला चालना देण्यासाठी पावलं उचलणार असल्याचं आश्वासन दिलं.

मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि खली यांच्यामध्ये १५ ते २० मिनीटं चर्चा झाली. या बैठकीनंतर खलीनं पत्रकारांशी संवाद साधला. भविष्यामध्ये राजकारणात येणाचा कोणताही विचार नाही, असं खली म्हणाला.