Team India squad for Asia Cup 2023: भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपचा ट्रेलर आता पहायला मिळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) म्हणजेच बीसीसीआयने आगामी आशिया कपसाठी (Asia Cup 2023) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आलीये. बीसीसीआयने 17 खेळाडूंची नाव जाहीर केली आहेत. यामध्ये तिलक वर्मा ते ईशान किशन अशा अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आलीये. मात्र, संघ निवडताना टीम इंडियाने मोठी चूक केल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सिलेक्टर्सवर टीका होताना दिसत आहे.
आशिया कप स्पर्धेसाठी नवीन खेळाडूंना प्राधान्य दिल्याचं समोर आलंय. शुभमन गिल, तिलक वर्मा आणि ईशान किशन या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता टीम इंडिया आशिया कप जिंकणार का? असा सवाल विचारला जात आहे. मात्र, टीम इंडियाने टीम सिलेक्टर करताना मोठी चूक केली आहे. टीम इंडियाने आशिया कपमध्ये सातत्य दाखवणाऱ्या शिखर धवनला (Shikhar Dhawan) संघाबाहेर ठेवलंय. 2014 आणि 2018 साली झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारताकडून सर्वोच्च धावा करणाऱ्या शिखरला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
शिखर धवनने 2014 साली 4 सामन्यात 48 च्या सरासरीने 192 धावा केल्या होत्या. तर शिखरने 2018 साली झालेल्या आशिया कप स्पर्धेत 5 सामन्यात 68.40 च्या सरासरीने 342 धावांची खेळी केली होती. आशिया कप स्पर्धेत भारताकडून धमाका करणारा तो दुसरा खेळाडू आहे. विराट कोहलीनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शिखर धवनचा समावेश आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा शिखर धवनने मिश्यांना पिळ देण्याची संधी चुकवली नाही. त्यामुळे गब्बरला संघाबाहेर ठेऊन आता सिलेक्टर्सने मोठी चूक केल्याचं म्हटलं जात आहे.
Rohit Sharma (Captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Tilak Varma, KL Rahul, Ishan Kishan, Hardik Pandya (VC), Ravindra Jadeja, Shardul Thakur, Axar Patel, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Mohd. Siraj, Prasidh Krishna
Traveling stand-by…
— BCCI (@BCCI) August 21, 2023
आशिया कप स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. या 6 संघांमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. आशिया कप स्पर्धेला येत्या 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 2 सप्टेंबरचा सामना सर्वाच रोमांचक असणार आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू : संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)
पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - 30 ऑगस्ट
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - 31 ऑगस्ट
भारत विरुद्ध पाकिस्तान - 2 सप्टेंबर
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - 3 सप्टेंबर
भारत विरुद्ध नेपाळ - 4 सप्टेंबर
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - 5 सप्टेंबर