ओव्हल : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नेहमी शानदार फलंदाजी करणारा भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने पुन्हा एक शतक झळकावले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हे त्याचे तिसरे शतक आहे.
वन डे कारकिर्दीतील हे त्याचे १० वे शतक आहे. त्यातील तीन त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लगावले आहेत.
शिखरने ११२ चेंडूत १३ चौकारांसह आपले शतक साजरे केले. शिखरने सुरूवातील सावध पवित्रा घेतला होता. पण रोहित शर्मा बाद झाल्यावर त्याने आपला धडका कायम ठेवत शतक साजरे केले.
यापूर्वी त्याने २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरूद्ध शतकी खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने ९४ चेंडू ११४ धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडिजविरूद्ध १०२ चेंडूत नाबाद १०७ केले होते.