Shardul Thakur Marriage: 'लॉर्ड' शार्दुल अडकला लग्नबंधनात! 'या' सौंर्दर्यवतीने केलं क्लिन बोल्ड; पहिला Photo आला समोर

Shardul Thakur Marriage First Photo: शार्दुल ठाकुरच्या लग्नाला भारतीय क्रिकेट संघामधील अनेक क्रिकेटपटू उपस्थित होते, तसेच या क्रिकेटपटूंच्या पत्नीही या लग्नाबरोबरच हळदीच्या कार्यक्रमालाही हजर होत्या.

Updated: Feb 27, 2023, 08:42 PM IST
Shardul Thakur Marriage: 'लॉर्ड' शार्दुल अडकला लग्नबंधनात! 'या' सौंर्दर्यवतीने केलं क्लिन बोल्ड; पहिला Photo आला समोर title=
Shardul Thakur Marriage

Shardul Thakur Mittali Parulkar Marriage First Photo: टीम इंडियाचा स्टार खेळाडू शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) प्रेयसी मिताली पारुळकरबरोबर (Mittali Parulkar) लग्नबंधनात अडकला. दोघांनी सोमवारी (27 फेब्रुवारी 2023) मुंबईमध्ये मराठमोळ्या पद्धतीने लग्न (Shardul Thakur Mittali Parulkar Marriage) केलं. यंदाच्या वर्षी लग्न करणाऱ्या के. एल. राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतरचा शार्दुल हा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. शार्दुल आणि मितालीच्या लग्नाचा पहिला फोटोही समोर आला आहे.

शार्दुल आणि मितालीचं लग्न अगदी थाटामाटात झालं. लग्नाच्या आधी संगीताचा कार्यक्रम झाला. त्यानंतर हळदीच्या कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांमधील फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यासारखे खेळाडू आपल्या कुटुंबियांबरोबर या कार्यक्रमांना उपस्थित होते. शार्दुल ठाकुरच्या एका फॅन पेजने पोस्ट केलेल्या लग्नाच्या फोटोला ये हाथ मुझे दे दे ठाकुर अशी मजेशीर कॅप्शन दिली आहे. शार्दुल आणि मितालीला टॅग करुन त्यांचं अभिनंदन चाहत्यांनी केलं आहे.

या फोटोमध्ये शार्दुल आणि मिताली एकमेकांच्या डोक्याला डोकं लावताना दिसत आहे. नवरदेव शार्दुल पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तर नवरी मिताली लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. दोघांचही लग्न मराठी पद्धतीने मुंबईत पार पडलं. 

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, अभिषेक नायर आणि मुंबईतील संघांशीसंबंधित सिद्देश लाडही या कार्यक्रमांना उपस्थित होते. सध्या या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शार्दुलची ओळख लॉर्ड शार्दुल अशी आहे. त्यामुळेच आपल्या लाडक्या लॉर्डला त्याचे अनेक चाहते शुभेच्छा देत आहेत. या लग्नाला उपस्थित असणाऱ्या अनेकांनी फोटो पोस्ट करुन या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.