मॉडेलला अश्लील मेसेज पाठवल्यामुळे शेन वॉर्न वादाच्या भोवऱ्यात, स्क्रिनशॉट व्हायरल

मॉडेलला पाठवलेल्या त्या एका अश्लील मेसेजमुळे शेन वॉर्नचा संसार मोडला, स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ  

Updated: Mar 5, 2022, 12:17 PM IST
मॉडेलला अश्लील मेसेज पाठवल्यामुळे शेन वॉर्न वादाच्या भोवऱ्यात, स्क्रिनशॉट व्हायरल title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर शेन वॉर्नचं (Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शेन वॉर्नच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला, पण निधनापूर्वीचे त्याचे अनेक किस्से आहेत ज्यामुळे तो कायम चर्चेत राहिला. शेन वॉर्नचं नाव अनेक मोठ्या सेक्स स्कँडलमध्ये देखील समोर आलं. एवढंच नाही तर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने शेनवर गंभीर आरोप केले.

शेन वॉर्नचं नाव अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे पुढे आलं, अशा अनेक प्रकरणांचा शेन वॉर्नच्या खासगी आयुष्यावर देखील परिणाम झाला. शेन वॉर्नच्या वादग्रस्त भूमिकांमुळे त्याचं घटस्फोट देखील झालं. 

इस मॉडल के साथ शेन वॉर्न ने की थी बेहद शर्मनाक हरकत, चैट के स्क्रीनशॉट भी हुए लीक

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल जेसिका पॉवरने (Jessika Power) शेनवर अश्लील मेसेज पाठवल्याचे आरोप केले. याआधी देखील शेनचे अनेक किस्से समोर आले. जेसिकने शेन वॉन विरोधात तक्रार दाखल केली. 

मॉडेलसोबतचे स्क्रिन शॉट
मॉडेलने स्क्रिन शॉट इन्स्टाग्रमवर देखील शेअर केले. शेनने मॉडेल जेसिकाला हॉटेल रुममध्ये भेटण्यासाठी बोलावलं होतं. पण मॉडेलने त्याला नकार दिला. त्यानंतर देखील तो सतत जेसिकाला मेसेज करत राहिला. 

यावर मॉडेल जेसिका म्हणाली, 'मला विश्वास नाही होत, तू मला असे मेसेज पाठवू शकतोस... ' इंग्लिश रियालिटी शो 'बिग ब्रदर व्हीआयपी'मध्ये जेसिकाने शेन वॉर्नवर अनेक गंभीर आरोप लावले.