मुंबई : आयपीएल ११ व्या सीजनमधील मुंबई आणि राजस्थानमध्ये टीममध्ये आज ४७ वी मॅच रंगणार आहे. आज रात्री ८ वाजता वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्क करण्यासाठी दोन्ही संघांमध्ये ही चुरशीची लढत असणार आहे. राजस्थानपेक्षा मुंबईची टीम सध्या मजबूत स्थितीत दिसत आहे. मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. त्यांनी एकूण ११ मॅचमध्ये ५ विजय आणि ६ पराजयांसोबत १० पॉईंट्स मिळविले आहेत. राजस्थानचेदेखील हेच आकडे आहेत. पण रनरेटने हा संघ मुंबई आणि कोलकाताच्या मागे पडला असून सहाव्या स्थानावर आहे.
My last day involved with the @rajasthanroyals today as I head back… https://t.co/YLbAbyRbcJ
— Shane Warne (@ShaneWarne) May 13, 2018
राजस्थानसाठी ही करो वा मरोची मॅच असतांनाच आता राजस्थानला आणखी एक धक्का बसला आहे. राजस्थानचा कोच शेन वॉर्न मायदेशी परतणार आहे. आजचा हा त्याचा शेवटचा सामना असल्याचं त्याने म्हटलं इन्स्टाग्रामवर म्हटलं आहे. आयपीएलमध्ये सहभागी होऊन आनंद झाल्याचं देखील त्याने म्हटलं आहे. त्यामुळे आज जरी राजस्थान प्लेऑफमध्ये गेली तरी त्याने वार्न शिवाय पुढचे सामने खेळावे लागणार आहे. वॉर्नची अनुपस्थिती संघाला नक्कीच भासणार आहे.