नेपाळच्या या युवा खेळाडूने पहिल्याच सामन्यात केली कमाल, एबी झाला हैराण

नेपाळच्या या खेळाडूने एबीला केलं हैराण

Updated: May 13, 2018, 03:09 PM IST
नेपाळच्या या युवा खेळाडूने पहिल्याच सामन्यात केली कमाल, एबी झाला हैराण title=

मुंबई : आयपीएलच्या सीजन 11 मध्ये ऐतिहासिक क्षण आला जेव्हा भारताचा शेजारी देश नेपाळच्या एका युवा लेग स्पिनर संदीप लेमिचाने दिल्लीकडून आयपीएलमध्ये पहिला सामना खेळला. दिल्ली आणि बंगळुरु यांच्यात झालेल्या या सामन्यात दिल्लीने 20 ओव्हरमध्ये चार विकेट गमवत 181 रन केले. नंतर बंगळुरु जेव्हा बॅटींग करण्यासाठी उतरली तेव्हा कर्णधार श्रेयस अय्यरने संदीपच्या हातात बॉल देत सगळ्यांना अचंबित केलं. संदीपला आयपीएलच्या लिलावात दिल्लीने 20 लाखांना विकत घेतलं आहे.

एबी झाला हैराण

संदीपने पहिल्या ओव्हरमध्ये विकेट नाही मिळवली पण दुसऱ्या ओव्हरमध्ये पार्थिव पटेलची विकेट घेत इतिहास रचला. संदीपने त्याच्या दुसऱ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर पार्थिव पटेलला एलबीडब्ल्यू आउट केलं. त्यानंतर मैदानावर बॅटींगसाठी आलेल्या एबी डिविलियर्सला या 17 वर्षाच्या रिस्ट स्पिनरने पहिल्याच बॉलमध्ये गुगली टाकत हैराण केलं. एबीने मॅच संपल्यानंतर म्हटलं की, 'हे खूपच कौतूकास्पद आहे की युवा खेळाडू इतकं चांगलं प्रदर्शन करत आहेत. आश्चर्य वाटतं की हे युवा खेळाडू असं कसं करतात.'

मायकल क्लार्कने दिली संधी

क्लार्कने लेमिचानेला दिल्लीच्या संघात घेतलं होतं. त्याच्या कामगिरीनंतर क्लार्कने ट्विटर म्हटलं की, 'माझा युवा सहकारी संदीप लेमिचानेला आयपीएलमध्ये पहिली संधी मिळाली. काय अद्भुत कथा आहे'. लेमिचानेने या मॅचमधून टी20 मध्येही पदार्पण केलं. त्याच्यासह दिल्लीने अभिषेक शर्मा आणि जूनियर डाला यांना देखील आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी दिली. दिल्लीचा कोच रिकी पाँटिंगने या तिघांना आयपीएलची कॅप सोपवली.