बाबा, खरं वाटतं नाहीये की....; शेन वॉर्नच्या मुलीची भावनिक पोस्ट

ब्रूकने शेन वॉर्नसाठी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

Updated: Mar 11, 2022, 12:06 PM IST
बाबा, खरं वाटतं नाहीये की....; शेन वॉर्नच्या मुलीची भावनिक पोस्ट title=

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर शेन वॉनचं 4 मार्च रोजी निधन झालं. थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असताना त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. शेन वॉनच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रिकेट जगतातील व्यक्तींना दुःख झालं. तर आता शेन वॉर्नची मुलगी देखील भावूक झाली आहे. तिने आपल्या वडिलांसाठी एक पोस्ट लिहीली आहे.

शेन वॉर्नची मुलगी ब्रूकने वडिलांसाठी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. वॉर्नला 3 मुली असून ब्रूक ही त्याची सर्वात मोठी मुलगी आहे. या इमोशनल पोस्टमध्ये, अजूनही विश्वास बसत नाहीये की वॉर्न आपल्याला सोडून गेलाय, असं म्हटलंय. 

ब्रूकने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, "बाबा, मला फार वाईट वाटलं आहे. तू आता आमच्यात नाहीस हे खरं वाटत नाहीये. तू खूप लवकर निघून गेलास. आयुष्य खूप क्रूर आहे. तुझ्या आयुष्यातील त्या शेवटच्या आठवणी मी माझ्या ह्रदयात जपून ठेवीन. ज्यामध्ये तू  हसायचास, विनोद करायचास..."

ब्रूक पुढे लिहीते, "आपण फार एकसारखे आहोत. मी नेहमी मस्करी करायची की मला तुझे जीन्स मिळाले आहेत आणि ते मला किती त्रास देतात. मी पार नशीबवान आहे की, मला तुमचे जीन्स मिळाले आहेत. मला गर्व आहे की, मी तुमची मुलगी आहे. माझं नेहमी तुमच्यावर प्रेम करेन आणि तुम्हाला नेहमी मीस करेन."

मेलबर्न क्रिकेट मैदानात देणार अखेरचा निरोप

शेन शेन वॉर्नला 30 मार्च रोजी मेलबर्नच्या क्रिकेट मैदान सार्वजनिक स्वरूपात अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. हे मैदान वॉनच्या खेळाच्या आठवणींपैकी एक मानलं जातं. विक्टोरिया राज्याचे पंतप्रधान डेनियल एंड्रयूज यांनी बुधवारी सांगितलं की, वॉर्नचा सन्मान म्हणून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.