माजी क्रिकेटर शेन वॉर्न विरोधात अभिनेत्रीची पोलिसात तक्रार

माहितीनूसार शेन वॉर्नने वॅलरी फॉक्स या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मारल्याचंही म्हणलं आहे.

Updated: Sep 25, 2017, 12:22 AM IST
माजी क्रिकेटर शेन वॉर्न विरोधात अभिनेत्रीची पोलिसात तक्रार title=

लंडन : ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनर शेन वॉर्नवर एका अभिनेत्रीला धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना लंडनमध्ये घडल्याचं सांगण्यात येत आहे.  सेंट्रल लंडन शनीवारी रात्री, परिसरातील एका बारमध्ये ही घटना घडली असं सांगण्यात येत आहे.

घटनास्थळावरील उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनूसार शेन वॉर्नने वॅलरी फॉक्स या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मारल्याचंही म्हणलं आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही तीने या घटनेची माहिती दिली आहे. तसेच हा प्रकार घडल्यानंतर, या अभिनेत्रीने पोलिसांमध्ये याची तक्रार दाखल केली आहे.