पत्नीला भेटण्यास शमीने दिला नकार

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद शमण्याची काही चिन्हेच दिसत नाहीयेत. शमीची पत्नी हसीन आपल्या मुलीसह मंगळवारी दिल्लीत आली. शमीच्या कारला रविवारी अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जखम झालीये. यानंतर शमीची पत्नी त्याला भेटण्यासाठी काल दिल्लीत आली. मात्र शमीने तिला भेटण्यास नकार दिला. 

Updated: Mar 28, 2018, 09:26 AM IST
पत्नीला भेटण्यास शमीने दिला नकार title=

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद शमण्याची काही चिन्हेच दिसत नाहीयेत. शमीची पत्नी हसीन आपल्या मुलीसह मंगळवारी दिल्लीत आली. शमीच्या कारला रविवारी अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जखम झालीये. यानंतर शमीची पत्नी त्याला भेटण्यासाठी काल दिल्लीत आली. मात्र शमीने तिला भेटण्यास नकार दिला. 

हसीन आणि शमीची भेट झाली मात्र त्यानंतर शमीने आपल्याला कोर्टात खेचण्याची धमकी दिल्याची माहिती हसीनने पत्रकार परिषदेत दिली. एएनआयने संध्याकाळी ६ वाजता हे ट्विट केलेय. यात हसीन म्हणाली, मी शमीला भेटण्यासाठी आले होते मात्र त्याने मला भेटण्यास नकार दिला. तसेच तुला कोर्टात बघेन अशी धमकीही दिली. 

पुढच्या ट्वीटमध्ये एएनआयने लिहिलयं, हो शमी भेटला. तो मुलीशी खेळलाही. मात्र त्याने माझ्याकडे पाहिलेही नाही. शमीची आई एका बॉडीगार्डप्रमाणे वागत होता - हसीन जहां.

याआधी कोलकातामध्ये हसीनने म्हटलं होतं की ती शमीला भेटण्यासाठी दिल्लीत जाणार नाही तर फक्त मुलगी त्याला भेटण्यासाठी जातेय. जेव्हापासून शमीच्या अपघाताबद्दल मुलीला कळलंय तेव्हापासून ती रडतेय, असे हसीनने सांगितले होते.