मुंबई : भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शमी वनडे इंटरनेशनल (ODI) मध्ये भारताकडून सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. शमीने बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध 100 वी विकेट घेतली. त्याने नॅपियरमध्ये सुरु असलेल्या सीरीजच्या पहिल्या सामन्यात आणि करिअरच्या 56 व्या सामन्यात न्यूझीलंडचा ओपनर मार्टिन गप्टिलला आउट करत आपले 100 विकेट पूर्ण केले.
शमीच्या आधी भारताकडून सर्वात जलद 100 वनडे विकेट घेण्याचा रेकॉर्ड इरफान पठानच्या नावावर होता. पठानने 59 सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड केला होता. या यादीत आता शमी, पठाननंतर जहीर खान (65 सामने, अजीत आगरकर (67 सामने) आणि जवागल श्रीनाथ (68 सामने) यांचा नंबर लागतो.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु झालेल्या वनडे सिरीजच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाचा भारताला फायदा झाला. न्यूझीलंडची टीम 38 ओव्हरमध्ये 157 रनवर ऑलआऊट झाली.
शमीने या सामन्यात पहिल्या ओव्हरमध्ये गप्टिलला 5 रनवर आऊट केलं. त्यानंतर शमीने सी मुनरोला माघारी पाठवलं. शमीने मुनरोला ८ रनवर बोल्ड केलं. मोहम्मद शमीने बुधवार शानदार कामगिरी केली. त्याने मिशेल सँटनरला 14 रनवर आऊट करत तिसरी विकेट घेतली.