U-19 World Women Cup मध्ये शेफालीचं वादळ, विरोधी संघाचा उडवला धुराळा!

युईए संघाने टॉस जिंकत प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला होता. मात्र सलामीला आलेल्या शेफाली आणि श्वेता सेहरावत यांनी मनसुब्यावर पाणी फेरलं.

Updated: Jan 16, 2023, 04:37 PM IST
U-19 World Women Cup मध्ये शेफालीचं वादळ, विरोधी संघाचा उडवला धुराळा! title=

U-19 World Women Cup : भारताच्या महिला क्रिकेट संघातील लेडी सेहवाग म्हणून ओळखली जाणाऱ्या शेफाली वर्माने (Shafali Verma) अंडर-19 महिला वर्ल्ड कपमध्ये (U-19 World Women Cup) आपली धुंवाधार खेळी केली आहे. पहिल्या सामन्यात केलेल्या नाबाद 45 धावांच्या वादळी खेळीनंतर युएईविरूद्धही आपला दांडपट्टा चालूच ठेवला आहे. युएई संघाने टॉस जिंकत प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला होता. मात्र सलामीला आलेल्या शेफाली आणि श्वेता सेहरावत यांनी मनसुब्यावर पाणी फेरलं. (Shafali Vermas batting against UAE in the U-19 Womens World Cup latest marath Sport News)

श्वेता आणि शेफालीने आक्रमण सुरु केलं, युएईच्या बालिंग लाईनअपची हवा काढून टाकली. दोघींनी 111 धावांची सलामी दिली असून यामध्ये शेफालीने फक्त 34 बॉलमध्ये 78 धावांची शानदार खेळी केली. शेफालीसह श्वेतानेही 49 बॉलमध्ये 79 धावा करत मजबूत सुरूवात करून दिली. शेफालीने आपल्या 78 धावांच्या खेळीमध्ये 12 चौकार आणि 4 षटकारांची बरसात केली.
 
शेफाली बाद झाल्यावर आलेल्या रिचा घोषनेही फोडकाम चालू ठेवत 29 बॉलमध्ये 49 धावा केल्या. रिचाने 5 चौकार आणि 2 षटकार मारत दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. 20 षटकात संघाने 3 विकेट गमावत 219 धावा केल्या आहेत. 

दरम्यान, पहिला सामना भारतीय संघाने जिंकत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. दुसरा सामना जिंकत शेफाली अँड कंपनी गुणतालिकेमधील भारताची जागा आणखी मजबूत करतील. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातही शेफालीने 45 धावा तर श्वेता सेहरावतने 57 चेंडूत 20 चौकारांसह नाबाद 92 धावांची खेळी केली होती.