सेहवाग, गेल आणि आफ्रिदी येणार आमने-सामने

टीम इंडियाचा माजी ओपनर विरेंद्र सेहवागचा जलवा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर सेहवागचे फटके तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका वेगळ्या टुर्नामेंटमध्ये सेहवाग खेळातांना दिसणार आहे. टूर्नामेंटमध्ये क्रिस गेल, कुमार संगकारा आणि शाहिद आफ्रिदी देखील खेळणार आहेत.

Updated: Aug 24, 2017, 12:41 PM IST
सेहवाग, गेल आणि आफ्रिदी येणार आमने-सामने title=

दुबई : टीम इंडियाचा माजी ओपनर विरेंद्र सेहवागचा जलवा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर सेहवागचे फटके तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका वेगळ्या टुर्नामेंटमध्ये सेहवाग खेळातांना दिसणार आहे. टूर्नामेंटमध्ये क्रिस गेल, कुमार संगकारा आणि शाहिद आफ्रिदी देखील खेळणार आहेत.

यूएईमध्ये २१ ते २४ डिसेंबरपर्यंत एक टुर्नामेंट खेळली जाणार आहे. ही एक टी-१० लीग असणार आहे. ज्यामध्ये १०-१० ओव्हरची मॅच खेळली जाणार आहे. आतापर्यंत क्रिकेट फॅन्सने टी-२० क्रिकेटची मजा घेतली आहे. पण आता त्यांना एक नवा फॉरमॅट पाहायला मिळणार आहे. शारजाह क्रिकेट स्टेडिअमवर हे सगळे सामने होणार आहे.

या टूर्नामेंटसाठी टीम पंजाबी, टीम पख्तून, टीम मराठा, टीम बांग्ला, टीम लंका, टीम सिंधी आणि टीम केरळ अशी नावे समोर आली आहेत. शाहिद अफ्रिदी टीम पख्तूनचा कर्णधार असणार आहे. या टूर्नामेंटसाठी खेळाडुंवर बोली देखील युएईमध्येच लावली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच शाहीद आफ्रिदीने ४२ बॉलमध्ये १०० रन करत तुफानी खेळी केली होती. त्यामुळे सेहवाग आता कशी इनिंग खेळेल याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

पाहा ती तुफानी खेळी