जवानांना थँक्यू म्हणा, गंभीरचं भावनिक आवाहन

देशाचे जवान कुठेही दिसले तरी त्यांना थँक्यू म्हणा, असं भावनिक आवाहन भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं केलं आहे.

Updated: May 30, 2017, 04:27 PM IST
जवानांना थँक्यू म्हणा, गंभीरचं भावनिक आवाहन title=

नवी दिल्ली : देशाचे जवान कुठेही दिसले तरी त्यांना थँक्यू म्हणा, असं भावनिक आवाहन भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं केलं आहे. थँक्यू म्हणल्यावर या जवानांसोबत सेल्फी काढा आणि #SoldierSelfies या हॅशटॅगनं पोस्ट करा असंही गंभीर म्हणाला आहे. ही भावनिक साद घालताना गंभीरनं ट्विटरवर एक व्हिडिओही शेअर केला आहे.

काश्मीरमध्ये होणारे दहशतवादी हल्ले, या हल्ल्यात सैनिकांना आलेलं हौतात्म्य आणि काश्मीरींकडून सैन्याला झालेल्या मारहाणीवर गंभीरनं नेहमीच रोखठोक भूमिका घेतली आहे. जवानांना एक थप्पड जरी मारली तरी त्याचं प्रत्युत्तर शंभर दहशतवाद्यांना मारून दिलं पाहिजे असं गंभीर म्हणाला होता. सुकमामध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यातल्या २५ शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही गंभीरनं उचलला आहे.

पाहा काय म्हणातोय गौतम गंभीर