Sara Tendulkar : मैं तेरे पीछे पीछे...; शुभमन गिलच्या पाठोपाठ सारानेही सोडलं लंडन, फोटो व्हायरल

Sara Tendulkar : सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) आणि टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहे. अशातच आता शुभमननंतर साराने ( Sara Tendulkar ) देखील लंडन सोडल्याचा एक फोटो व्हायरल झालाय.

Updated: Jun 13, 2023, 07:47 PM IST
Sara Tendulkar : मैं तेरे पीछे पीछे...; शुभमन गिलच्या पाठोपाठ सारानेही सोडलं लंडन, फोटो व्हायरल title=

Sara Tendulkar : गेल्या काही महिन्यांपासून सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar ) ची मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) आणि टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहे. हे दोघंही एकमेकांनी डेट करत असल्याचा दावा केला जातो. कधी दोघांचे एकाच हॉटेलमधील फोटो सोशल मीडियावर दिसतात तर कधी स्टेडियममध्ये साराच्या नावाने शुभमनला ( Shubman Gill ) चिडवण्यात येतं. अशातच आता शुभमननंतर साराने ( Sara Tendulkar ) देखील लंडन सोडल्याचा एक फोटो व्हायरल झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांना डेट करतायत असं म्हटलं जातंय. 

शुभमन होता लंडनमध्ये 

नुकंतच इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी टीम इंडिया लंडनला गेली होती. यावेळी टीम इंडियामध्ये शुभमन गिलचाही समावेश होता. शुभमन गिल ( Shubman Gill ) इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर काही दिवसांनी सारा ( Sara Tendulkar ) देखील इंग्लंडला गेली असल्याचं तिच्या सोशल मीडियावर पोस्टवरून समजलं.

दरम्यान साराच्या या पोस्टनंतर ती शुभमन ( Shubman Gill ) पाठोपाठ लंडनला गेली असल्याचा तर्क चाहत्यांकडून लावण्यात आला. तर आता साराने पोस्ट केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीनंतर तिने लंडन सोडल्याचं समजतंय. मुख्य म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना खेळून झाल्यानंतर शुभमन गिलने ( Shubman Gill ) देखील लंडन सोडलं असल्याची माहिती आहे. दरम्यान याबाबत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही.

काही दिवसांपूर्वी सारा ( Sara Tendulkar ) लंडनमध्ये गेली होती. तर आता तिने लंडन सोडून ती नायरोबी साठी रवाना झाल्याची तिने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट केलीये.

23 वर्षीय शुभमन गिलच्या ( Shubman Gill ) पर्सनल लाईफाबाबत अनेक बातम्या समोर येत असतात. कधी शुभमनचं नाव सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं तर कधी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत गिलला स्पॉट केलं जातं. भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामन्यादरम्यान शुभमन गिल ( Shubman Gill ) फिल्डींग करतेवेळी साराच्या नावाने चिडवण्यात देखील आलं. 'हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो' असा नारा चाहत्यांनी स्टेडियममध्ये लगावला होता.

साराशी ब्रेकअपच्या चर्चा

सोशल मीडियावर अशी चर्चा रंगते की, गिल ( Shubman Gill ) आधी सारा तेंडुलकरला( Sara Tendulkar ) डेट करत होता. त्यानंतर तिच्याशी ब्रेकअप झाला, त्यानंतर तो सारा अली खानला डेट करू लागला. दरम्यान याबाबत शुभमन गिल, सारा तेंडुलकर किंवा सारा अली खान यांनी यांच्याकडून अधिकृत वक्तव्य कधीही करण्यात आलेलं नाही.