मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या सिझनमध्ये गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम चांगला खेळ करताना दिसतेय. या टीमने आतापर्यंत 5 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या टीमचा 37 रन्सने पराभव केला. यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने मोठं विधान केलं आहे.
सॅमसनने विरोधी टीमचा कर्णधार हार्दिक पंड्याचं कौतुक केलंय. सॅमसन म्हणाला, "मी त्यांच्या फलंदाजांना श्रेय देऊ इच्छितो. हार्दिकने चांगली खेळी खेळली. जर आमच्या हातात विकेट्स असते तर लक्ष्य पूर्ण करणं सोपं होतं. रन रेटच्या बाबतीत आम्ही सारखे होतो, पॉवरप्लेमध्ये आमचा रन रेट खूपच चांगला होता. पण आम्ही विकेट गमावत राहिलो, आणि तीच चूक झाली."
सॅमसन म्हणाला, 'निश्चितपणे बोल्टची कमी आम्हाला जाणवली. तो लवकरच परत येईल अशी आशा आहे. हार्दिक आजचा दिवस चांगला होता, त्याने चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी केली.
गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 37 रन्सने पराभव करत चौथा विजय नोंदवला. यासह गुजरातने पॉईंट्स टेबलने अव्वल स्थान पटकावलंय. या सामन्यात गुजरातच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. गुजरातच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. गुजरातकडून यश दयाल आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतले.