मुंबई : " फ्लावर नही फायर है मै " या पुष्पा सिनेमाच्या डायलॉगने अख्ख्या देशाला वेड लावले आहे. अनेक राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनाचं या वाक्याने जणू काही भुरळचं घातली आहे. यात आता आणखी भर पडली आहे ती भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनमुळे.
आयपीएलच्या सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडीयंसचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने उत्तम कामगिरी केली. त्याने आपल्या चार ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या. बुमराहची 15 व्या सीझनमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यामुळे क्रिकेट प्रेमींचा आनंद द्विगुणीत झाला. बुमराहच्या कामासोबतचं त्याच्या पत्नीचीही चर्चा रंगली.
बुमराहने विकेट घेताचं संजनाने हटके पद्धतीने आनंद साजरा केला. पण एवढ्यावरचं न थांबता बॉलिंग संपताचं तिने एक ट्विट केले जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 'यॉर्कर' किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहने 5 विकेट घेतल्या. त्यानंतर त्याची पत्नी संजना गणेशनने सोशल मीडियावर तिच्या पतीचे कौतुक केले.
Holy moly! My husband is
— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) May 9, 2022
सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त करत ट्विट केलं. या ट्वीटमध्ये तिने फायरचं इमोजी वापरलं आहे. 'माझा नवरा फायर आहे.' असं पुढे संजनाने कॅप्शन दिलं आहे. तिचं हे ट्वीट वाऱ्याच्या वेगानं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं.
याआधी संजना आणि बुमराह फोटोशूट करत असल्याच्या व्हिडीओची चर्चा रंगली होती. आता या ट्वीटनं पुन्हा एकदा संजना चर्चेत आली. कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात बुमराहला चिअर्स करताना संजना दिसली. याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.