Sania-Shoaib Divorce: सानियानं शोएबला दिला घटस्फोट! टेनिसपटुच्या वडिलांनी केला खुलासा

Sania Mirza-Shoaib Malik Divorce: सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकनं केलं तिसरं लग्न... तर चाहत्यांना पडलाय घटस्फोटाचा प्रश्न

दिक्षा पाटील | Updated: Jan 20, 2024, 04:30 PM IST
Sania-Shoaib Divorce: सानियानं शोएबला दिला घटस्फोट! टेनिसपटुच्या वडिलांनी केला खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Sania Mirza-Shoaib Malik Divorce: पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे. हा त्याचा तिसरा निकाह आहे. या आधी त्यानं आयशा सिद्दिकी आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी लग्न केलं होतं. 2010 मध्ये सानियाशी लग्न करण्यासाठी त्यानं आयशाला घटस्फोट दिला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सानिया आणि शोएबमध्ये दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनात हाच प्रश्न येत होता की त्यांचा घटस्फोट झाला का? त्यात शोएबनं तिसरं लग्न केल्यानं नक्की काय प्रकरण आहे ते सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. या सगळ्या प्रकरणावर आता सानिया मिर्झाचे वडील इमरान मिर्झा यांनी वक्तव्य केलं आहे. यात मोठी गोष्ट म्हणजे घटस्फोट शोएबनं नाही तर सानियानं दिला आहे.

सानियाच्या वडिलांनी एका न्यूज एजेंसीला ही माहिती दिली की "हे 'खुला' होतं. 'खुला' च्या अंतर्गत एक मुस्लिम महिला तिच्या पतीला एकतर्फी घटस्फोट देऊ शकते. तिच्याकडे हा अधिकार असतो. 'खुला' ची इच्छा फक्त एक पत्नीच ठेऊ शकते. इमरान मिर्झा यांनी दिलेल्या या वक्तव्यानं सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काय असतो खुला?

खुला हा घटस्फोटाचा एक वेगळा प्रकार आहे. त्याच्यात आणि घटस्फोटात फक्त इतकाच फरक आहे की हा महिलेकडून देण्यात येतो. खुलाच्या मदतीनं एखादी महिला ही तिच्या नवऱ्यासोबतचे सगळे संबंध तोडू शकते. घटस्फोटात पुरुष त्याच्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतो, तर दुसरीकडे खुलामध्ये महिला तिच्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेते. या प्रकारच्या घटस्फोटाचा उल्लेख हा 'कुरान' आणि 'हदीस' मध्ये देण्यात आला आहे. 

हेही वाचा : सानिया आधी कोण होती शोएबची भारतीय पत्नी? घटस्फोट न देताच करणार होता दुसरा निकाह

'खुला' साठी पती आणि पत्नी दोघांचा होकार असणं गरजेचं असते. खुलाची प्रक्रिया ही त्या मुस्लिम महिलांना संन्मानानं घटस्फोट घेण्याचा पर्याय समोर ठेवते. खुला त्या महिला घेऊ शकतात ज्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी नाहीत. एकदा घटस्फोट दिल्यानंतर पत्नीला तिचा हक्क असेलेल्या संपत्तीचा काही भाग सोडावा लागतो नाही तर काही अधिकार सोडावे लागतात. 

कोण आहे सना जावेद?

पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदही एक घटस्फोटित आहे. तिनं 2020 मध्ये उमैर जसवालशी निकाह केला होता. त्यानंतर काही काळात त्यांचा घटस्फोट झाला. तर सना ही 28 वर्षांची असून ती पाकिस्तानी मालिकांमध्ये दिसते. तर सना आणि शोएबच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु झाल्या होत्या. तर निकाहनंतर सनानं सोशल मीडियावर तिचं नाव बदललं आहे. आता तिनं सना शोएब मलिक असं नाव केलं आहे.