सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चां, शोएब मलिकनं केला तिसरा निकाह

Malik Marries Sana Javed : लोकप्रिय भारतीय महिला टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकनं थाटला तिसरा संसार. फोटो शेअर करत दिली माहिती...

दिक्षा पाटील | Updated: Jan 20, 2024, 01:39 PM IST
सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चां, शोएब मलिकनं केला तिसरा निकाह title=
(Photo Credit : Social Media)

Malik Marries Sana Javed : लोकप्रिय टेनिस पटू सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकनं तिसरं लग्न केलं आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. शोएबनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून शोएब आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या. तर दुसरीकडे त्याचं नाव पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी जोडण्यात येत होतं. मात्र, त्या दोघांनी कधीच या बातमीला दुजोरा दिला नव्हता. अखेर सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 

शोएबनं आज शनिवारी 20 जानेवारी रोजी त्याच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. ते दोघं पारंपरीक वेषात खूप सुंदर दिसत आहेत. शोएबनं पांढऱ्या रंगाची शेरवाणी परिधान केली आहे. तर दुसरीकडे सनानं क्रिम रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. त्या दोघांनी लग्नाचे फोटो शेअर करत 'Alhamdullilah And We created you in pairs' असं कॅप्शन दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे सना जावेद? 

सना जावेद ही पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री आहे. याशिवाय सना ही घटस्फोटित आहे. तिनं 2020 मध्ये उमैर जसवालशी निकाह केला होता. मात्र, त्यांचा संसार जास्त काळ टिकला नाही. काही काळानंतर त्यांनी एकमेकांसोबतचे सगळे फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले. त्यानंतर त्या दोघांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली. सना ही 28 वर्षांची आहे. तर तिनं छोट्या पडद्यावर देखील काम केलं आहे. 

हेही वाचा : 'Animal सारखा चित्रपट कधीच करणार नाही'; शाहरुखच्या 'या' अभिनेत्रीचं मोठ वक्तव्य

सानियाची क्रिप्टिक पोस्ट

बुधवारी सानियानं एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिनं असं काही लिहिलं होतं की तिच्या आणि शोएबच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. सानियानं लिहिलं होतं की 'आपला कठीण रस्ता निवडा. स्थूलता कठीण आहे. फिट राहणे कठीण आहे. आपला कठीण रस्त्या निवडा. कर्जात राहणं कठीण आहे. आर्थिक शिस्त कठीण आहे. आपला कठीण रस्ता निवडा. बोलणं कठीण आहे. न बोलणंही कठीण आहे. आपलं कठीण निवडा. आयुष्य कधीच सोपं नसतं. ते नेहमीच कठीण असतं. पण आपण आपला कठीण रस्ता निवडू शकतो. समजदारीने निवडा.' दरम्यान, सानिया आधी शोएबनं आयशा सिद्दिकीशी पहिलं लग्न केलं होतं.