Sania Mirza Shoaib Malik : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या पर्सनल लाईफमध्ये आलेल्या मोठ्या वादळामुळे पुन्हा एकदा ती चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक(Shoaib Malik) यांच्या नात्यात दुरावा आलाय. विषय अगदी घटस्फोटापर्यंत पोहचल्याचीही चर्चा आहे. मात्र, यांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? लग्नाआधी सानियाची एन्गेजमेंट (Sania Mirza Engagement) देखील मोडली होती.
सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये लग्न केलं. सानियाने यापूर्वी 2009 मध्ये बालपणीचा मित्र असलेल्या सोहराब मिर्झासोबत ब्रेकअप केलं होतं. त्यावेळी दोघांची एन्गेजमेंट देखील तुटली होती. एन्गेजमेंट तुटण्यामागचं कारण सध्या उघड झालं नाही, मात्र सोहराब आणि सानियाने मिळून हा निर्णय घेतल्याचे कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
अभिनेत्रीसोबत नवऱ्याचे स्विमिंगपूलमध्ये बोल्ड आणि हॉट फोटोशूट; तेव्हापासूनच सानिया मिर्झा...
सुरुवातीच्या काळात टेनिस खेळताना शॉर्ट ड्रेस घातल्याने सानिया मिर्झाच्या विरोधातही फतवा काढण्यात आला होता. 2005 मध्ये एका धर्मगुरूने त्यांच्या विरोधात फतवा जारी करताना त्यांच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. मात्र, मला काय घालायचंय काय नाही, हे ती स्वत: ठरवेल, असं ती म्हणाली होती. त्यानंतर वाद शांत झाला.
Sania Mirza Shoaib Malik Love Story: पहिल्या भेटीत इग्नोर...पण नंतर असं जडलं प्रेम!
दरम्यान, 2007 मध्ये सानिया मिर्झाही एका धार्मिक स्थळावर शूटिंग केल्यामुळं धर्मगुरूंच्या निशाण्यावर आली होती. 2008 मध्ये तिरंग्याकडे पाय ठेवून बसल्याचा फोटो व्हायरल झाला अन् तिच्यावर टीका करण्यात आली होती. यानंतर सानियावर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोपही करण्यात आला होता.