सानिया-शोएबच्या आयुष्यात लवकरच येणार नवा पाहुणा...

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज.

Updated: Apr 23, 2018, 07:00 PM IST
सानिया-शोएबच्या आयुष्यात लवकरच येणार नवा पाहुणा... title=

मुंबई : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट केली. ही पोस्ट तिच्या चाहत्यांना सुखावणारी होती. सानिया मिर्जा आणि शोएब मलिक यांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार असल्याची आनंदवार्ता तिने या पोस्टद्वारे दिली. इंस्टाग्रामवर एक क्यूट फोटो शेअर करत तिने ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली. फोटो शेअर करत सानियाने लिहिले- बेबी मिर्जा-मलिक.

पतीसोबत मिळून घेतला हा मोठा निर्णय

सानियाने गोवा फेस्ट २०१८ मध्ये लैगिंक पक्षपातबद्दलच्या एका कार्यक्रमात सांगितले की, मी आणि माझ्या पतीने आमच्या होणाऱ्या मुलाचे आडनाव मिर्झा-मलिक असेल असा निर्णय घेतला आहे. आम्हाला एक मुलगी हवी आहे. 

Sania Mirza, Shoaib Malik,

लैंगिक पक्षपाताचा अनुभव

लैंगिक पक्षपाताचा अनुभव शेअर करताना सानिया म्हणाली की, आम्ही दोघी बहिणी आहोत. आम्हाला कधीच एक भाऊ असावा असे वाटले नाही. आमचे नातेवाईक आमच्या आई-वडिलांना एक मुलगा हवा असे म्हणायचे तेव्हा आम्ही त्यांच्याशी भांडायचो. मी लग्नानंतर आडनावही बदलले नाही आणि मी नेहमी सानिया मिर्झाच राहीन.

पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न केल्याने तिच्यावर टिकास्त्र

भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी १२ एप्रिल २०१० मध्ये लग्न केले. तरी देखील सानिया भारतासाठीच खेळते. काही दिवसांपासून ती टेनिस कोर्टापासून दूर आहे. १५ नोव्हेंबर १९८६ साली सानियाचा जन्म मुंबईत झाला. जीवनाचे चढउतार पार करत तिने टेनिस विश्वात जबरदस्त यश मिळवले. तिला पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न केल्याने तिच्यावर अनेक प्रकारे टिका झाल्या. मात्र त्या सगळ्याला खंबीरपणे सामोरी जात ती आयुष्यातील नव्या टप्प्यावर आहे.