VIDEO : सानिया - शोएबचा हा 'मस्ती' व्हिडिओ पाहिलात का?

भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा गेले काही दिवस पती शोएब मलिकसोबत पाकिस्तानात होती. 

Updated: Nov 3, 2017, 12:49 PM IST
VIDEO : सानिया - शोएबचा हा 'मस्ती' व्हिडिओ पाहिलात का? title=

नवी दिल्ली : भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा गेले काही दिवस पती शोएब मलिकसोबत पाकिस्तानात होती. 

पाकिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान तीन मॅचच्या टी २० सीरिजची शेवटची मॅच लाहोरमध्ये खेळली गेली. या मॅचसाठी पाकिस्तानात सानिया मिर्झाही उपस्थित होती. यानंतर सानिया आता पुन्हा दिल्लीत परतलीय. 

या दौऱ्यातील सानियाचे पती शोएबसोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहेत. यातील एक व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडलाय. 

या व्हिडिओमध्ये दोघेही मस्ती करताना दिसता आहेत... ते काय बोलत आहेत हे कळत नसलं तरी त्यांची ही केमिस्ट्री दोघांच्याही चाहत्यांना आवडतेय.