मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उत्तम खेळाडू आहेच. पण त्यासोबत तो उत्तम व्यक्तीमत्व देखील आहे. सचिन तेंडुलकर अतिशय भावूक व्यक्ती आहे. हेच सचिनचं वेगळेपण पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. सचिनची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
सचिनच्या जीवलग मैत्रिणीचा अपघात झाला. या अपघातात जीव वाचवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे सचिनने आभार मानले आहेत. सचिनने ट्विट करून खास पोस्ट लिहिली आहे.
A heartfelt thanks to all those who go beyond the call of duty. pic.twitter.com/GXAofvLOHx
— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 17, 2021
काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरच्या मैत्रिणीचा भीषण अपघात झाला होता. जेव्हा एका वाहतूक पोलिसाने वेळीच मदत केली. आता सचिनने ट्विटरवर एक पोस्ट लिहून वाहतूक पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे.
सचिनने लिहिले की, 'काही दिवसांपूर्वी माझ्या जवळच्या मैत्रिणीचा गंभीर अपघात झाला होता. देवाच्या कृपेने ती आता बरी आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या वेळीच मदत मिळाल्याने हे शक्य झाले. अशा लोकांमुळे जग हे सुंदर आहे, असे त्यांनी ट्विटरवर लिहिलेल्या पोस्टला शीर्षक दिले आहे.
सचिन तेंडुलकर स्वत:ही खूप जिंदादील व्यक्ती आहे. सचिनने लिहिले, 'पोलिसाने समजूतदारपणा दाखवत जखमी व्यक्तीला तात्काळ ऑटोमधून रुग्णालयात नेले. अपघातात मैत्रिणीच्या मणक्याला दुखापत झाली. मात्र त्याला आणखी नुकसान होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली. तेंडुलकरने सांगितलं की, मी पोलिसांना भेटलो, आणि त्यांच्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले.
त्याच्यासारखे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत - जे कर्तव्यापलीकडे इतरांना मदत करतात. अशा लोकांमुळे जग सुंदर आहे. अशी सेवा करणाऱ्या लोकांचे आभार मानण्यासाठी जनतेने थोडा वेळ काढला पाहिजे. ट्रॅफिक पोलिसांच्या कामाचे कौतुक करून भारताच्या या माजी फलंदाजाने सर्वसामान्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
सचिन तेंडुलकरची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेट जगतावर राज्य केले आहे, त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याची षटकार मारण्याची कला जगाला चांगलीच अवगत आहे. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 200 सामने खेळताना 51 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 शतके झळकावली आहेत. चाहते त्याला प्रेमाने मास्टर ब्लास्टर म्हणतात.