...म्हणून सचिन तेंडुलकरने कधीच केली नाही अल्कहोलची जाहीरात, हे आहे खरं कारण

देशातील लाखो तरुणांसाठी सचिन एक रोल मॉडेल आहे, त्याचं अनुकरण करतात, आणि हेच कारण होतं, की सचिनच्या वडिलांनी त्याला तंबाखू किंवा अल्कहोलची जाहीरात न करण्याचा सल्ला दिला. 

Updated: Jun 11, 2021, 08:26 PM IST
...म्हणून सचिन तेंडुलकरने कधीच केली नाही अल्कहोलची जाहीरात, हे आहे खरं कारण title=

मुंबई : जंटलमेन्स गेम्समधील सर्वात जंटलमेन खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानावर क्रिकेटशी जितका प्रामाणिक होता, तितकाच तो मैदानाबाहेरही. याची अनेक उदाहरणं आहेत. यापैकीच एक उदाहरण म्हणजे सचिनने आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत कधीच अल्कहोलची जाहीरात केली नाही. स्वत: सचिनने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

सचिनने दिलं होतं आपल्या वडिलांना वचन

देशातील लाखो तरुणांसाठी सचिन एक रोल मॉडेल आहे, त्याचं अनुकरण करतात, आणि हेच कारण होतं, की सचिनच्या वडिलांनी त्याला तंबाखू किंवा अल्कहोलची जाहीरात न करण्याचा सल्ला दिला. आणि सचिनही आपल्या वडिलांना तसं वचनच दिलं. आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनने हे वचन कधीच मोडलं नाही. 1990 च्या दशकात आपल्या क्रिकेटच्या बॅटवर कोणत्याच जाहीरातीचा स्टिकर नव्हता. त्यावेळी अनेक क्रिकेटपटू तंबाखू जन्य पदार्थांचं प्रमोशन करत होते. सचिनलाही अनेक कंपन्यांनी प्रस्ताव दिले. पण सचिनने कधीच अशा ब्रँडचं समर्थन केलं नाही.

...म्हणून सचिन आहे क्रिकेटचा देव

असं म्हणतात, 'क्रिकेट ज्यांचा धर्म आहे. सचिन त्यांचा देव आहे'. 90 च्या दशकात बदलत्या भारतासाठी तो आशेचा किरण होता. केवळ आपल्या खेळानंच नाही तर आपल्या वागण्यानंही तो तरुण पिढीचा आदर्श आहे. तरुण पिढीला त्यानं स्वप्न बघायला शिकवलं होतं. स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलं. 

क्रिकेटमध्ये धावांचा विक्रम

1989 साली पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या सचिनने कसोटी कारकिर्दीत 54.08 च्या स्ट्राईक रेटने 15921 धावा केल्या. यात 51 शतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 86.24 च्या स्ट्राईक रेटने सचिनने 18426 धावा केल्या. यात 49 शतकांचा समावेश आहे.