मुंबई: टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत. 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध WTC 2021चा अंतिम सामना खेळण्यात येणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी क्रिकेटपटूंना त्यांच्या गर्लफ्रेंड आणि पत्नीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी बीसीसीआयकडून मिळाली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली वामिका आणि अनुष्कासोबत इंग्लंडमध्ये आहे. त्यानंतर आता के एल राहुल आपल्या गर्लफ्रेंडसोबत गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.
के एल राहुल आणि त्याची रूमर्ड गर्लफ्रेंड अथिया शेट्टी यांची सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगली आहे. दोघांनी एकाच जागेवरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. दोघांनी एकच जॅकेट घातलेला फोटो शेअर केल्यानं दोघं एकत्र इंग्लंडमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. आथियाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती हॉटेलच्या रूममध्ये ती के एल राहुलचं जॅकेट घालून फोटो शूट करताना दिसत आहे.
आथिया शेट्टी या जॅकेटमुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. फॅन्सनं ती इंग्लंड दौऱ्यावर असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सुनिल शेट्टी यांची मुलगी आथिया आणि के एल राहुलच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. दोघंही गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
टीम इंडियाच्या क्रिकेटरचं जॅकेट गर्लफ्रेंडवर ढापण्याची वेळ का आली?