सचिनच्या सल्ल्यानंतर अर्जुनचा मोठा निर्णय

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही क्रिकेटविश्वात आपलं नाव कमावतोयं.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Mar 1, 2018, 12:01 PM IST
सचिनच्या सल्ल्यानंतर अर्जुनचा मोठा निर्णय  title=

मुंबई : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही क्रिकेटविश्वात आपलं नाव कमावतोयं.

आपल्या कलागुणामुळे त्याने स्वत:ची ओळख बनविली आहे. दिवसेंदिवस उंच उंच शिखर तो पार करतोय.

टी २० मुंबई लीग 

 येणाऱ्या टी २० मुंबई लीगसाठीही अर्जुन सज्ज झाला होता. आपण टी २० मुंबई लीगमध्ये खेळणार असल्याची घोषणाही त्याने काही दिवसांपूर्वी केली होती.

त्यामुळे आयोजकांनाही आनंद झाला होता. 

निर्णय मागे  

पण सचिन तेंडुलकरने त्याला महत्त्वाचा सल्ला दिला आणि अर्जुनने आपला निर्णय मागे घेतला.

११ ते २१ मार्च दरम्यान टी २० मुंबई लीग होतेय. वानखेडे स्टेडियमवर या लीगचा थरार पाहायला मिळेल. सचिन तेंडुलकर या लीगचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. 

अर्जुन मेहनत घेतोय 

 यासंदर्भात अर्जुनने प्रतिक्रिया दिली नाही. पण अर्जुन आपल्या बॉलिंग अॅक्शनसहित अनेक गोष्टींवर मेहनत घेतोय असे त्याच्या पर्सनल ट्रेनरने सांगितलयं.