Sachin Tendulkar: 'बाबा तुमची आठवण येतीये..', वडिलांच्या आठवणीत क्रिकेटचा देव भावूक!

Sachin Tendulkar News: सचिन तेंडुलकरनं भारतासाठी क्रिकेट खेळावं आणि देशाचं नाव मोठं करावं, असं सचिनच्या वडिलांचं स्वप्न होतं. सचिन नेहमी त्याच्या वडिलांच्या तत्वांवर चालत आला आहे.

Updated: Jun 18, 2023, 06:40 PM IST
Sachin Tendulkar: 'बाबा तुमची आठवण येतीये..', वडिलांच्या आठवणीत क्रिकेटचा देव भावूक! title=
Sachin Tendulkar's Father's Day Tweet

Sachin Tendulkar Tweet: साल होतं 1999... टीम इंडिया इंग्लंडमध्ये वनडे वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup) खेळत होती. या स्पर्धेतील झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यापूर्वी सचिनला फोन आला. त्याला वडिलांच्या (Sachin Tendulkar Father) निधनाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर 23 मे 1999 रोजी शतक ठोकल्यानंतर पहिल्यांदा सचिनने आकाशाकडे बघत वडिलांना श्रद्धांजली वाहिली. हा क्षण सचिनसाठी खूप भावूक करणारा क्षण होता. अशातच आता आज फादर्स डे (Fathers Day 2023) दिवशी सचिनने भावूक पोस्ट लिहिली आहे.

सचिन तेंडुलकरनं भारतासाठी क्रिकेट खेळावं आणि देशाचं नाव मोठं करावं, असं सचिनच्या वडिलांचं स्वप्न होतं. सचिन नेहमी त्याच्या वडिलांच्या तत्वांवर चालत आला आहे. सचिनने अनेकदा वडिलांच्या अनेक आठवणी शेअर करत असतो. अशातच जागतिक फादर्स डे दिवशी सचिनने वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. वडिलांच्या आठवणीत त्याने खास ट्विट (Sachin Tendulkar Tweet) केलंय.

आणखी वाचा - Sachin Tendulkar: 'माझ्या वडिलांनी मेसेज पाहिला असता तर...', क्रिकेटचा देव जेव्हा भावूक झाला!

काय म्हणाला सचिन तेंडूलकर?

माझे वडील कडक नव्हते, ते खूप प्रेमळ होते. घाबरण्याऐवजी त्यांनी नेहमीा प्रेमानं वागवलं. त्यांनी मला खूप काही शिकवलं आणि जग माझ्यासाठी अभिप्रेत आहे, याची जाणीव करून दिली. त्याची विचारसरणी, मूल्ये आणि पालकत्वाच्या त्याच्या कल्पना काळाच्या खूप पुढे होत्या. मला तुमची आठवण येते बाबा, असं म्हणत वडिलांच्या आठवणीत सचिनने ट्विट केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी समालोचक हर्षा भोगले यांनी सचिनच्या वाढदिवसाचा एक किस्सा सांगितला होता. आता 50 होशील, 100 खूप केले पण ते एका क्रिकेटपटूचे होते, हे 50 एका उत्तम माणसाचे आहेत, असाच रहा, असा मेसेज हर्षा भोगले यांनी केला होता. त्यावर सचिनने हर्षा भोगले यांना रिप्लाय केला. 'कदाचित माझ्या वडिलांनी मॅसेज पहिला असता', असं उत्तर सचिनने हर्षा भोगले यांना दिलं होतं. यावरून सचिन तेंडूलकरचं वडिलांवर असलेलं प्रेम दिसून येतंय.