सचिssssन सचिन! मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar नावाचा अर्थ माहितीये का तुम्हाला?

Sachin Tendulkar : ज्या मंडळींची नावं सचिन आहेत त्यांनी आणि नाहीत त्यांनीही पाहा आपल्या लाडक्या सचिनच्या नावाचा अर्थ.... आज 50 वा वाढदिवस साजरा करतोय क्रिकेटचा देव! तुम्ही शुभेच्छा दिल्या का?   

Updated: Apr 24, 2023, 08:32 AM IST
सचिssssन सचिन! मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar नावाचा अर्थ माहितीये का तुम्हाला?  title=
sachin tendulkar birthday know the meaning of his name cricket news latest update

Sachin Tendulkar.... नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर येतो एक हसरा चेहरा. मैदानावर येणाऱ्या या क्रिकेटपटूनं जगभरातील उत्तमोत्तम गोलंदाजांना आपल्या फलंदाजीनं हैराण केलं. तर, ज्या साहेबांच्या देशानं जगाला क्रिकेटसारखा खेळ दिला, त्याच साहेबांच्या देशात त्यानं हेवा वाटण्याजोगी कामगिरीही केली. भारतीय क्रिकेट जगतात, सचिन म्हणजे विक्रमादित्य, सचिन म्हणजे क्रिकेटचा देव. नवख्या क्रिकेटपटूंसाठी सचिन म्हणजे आदर्श आणि क्रिकेटप्रेमींसाठी सचिन म्हणजे, आपला सचिन! 

असा हा जगविख्यात खेळाडू 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिनचा वाढदिवस म्हटलं की कल्ला तर होणारच. असाच कल्ला सध्या नेटकरी करताना दिसत आहेत. अहो सचिनं या देशात असणारं वेड इतकं की, काहींनी या खेळाडूच्याच नावावरून आपल्या मुलांनाही 'सचिन' हे नाव दिलं आहे. काहींना हे नाव आपल्याला का नाही मिळालं, याची खंतही आहे... एका खेळाडूप्रती असणारी ही आपुलकी आणि इतकं प्रेम पाहता खुद्द सचिनही कैकदा गहिवरला आहे. (sachin tendulkar birthday know the meaning of his name cricket news latest update)

काय आहे सचिनच्या नावाचा अर्थ? 

एक कुतूहलाचा भाग म्हणून.... तुम्ही सचिन हे नाव अनेकदा ऐकलं असेल. पण, त्याचा अर्थ तुम्हाला माहितीये का? सचिन म्हणजे शुद्ध, सचिन म्हणजे एखाद्याचं अस्तित्वं, सचिन म्हणजे शिवशंभो. थोडंसं ज्योतिषविद्येत डोकावल्यास असं म्हणतात की या नावाच्या व्यक्ती प्रचंड यश संपादन करतात. सुरुवातीपासूनच ही मंडळी स्वत:च्या स्वभावावर नियंत्रण ठेवणं शिकतात. कोणत्याही स्वार्थाशिवाय ही मंडळी काम करतात. आहेत की नाही हे गुण आपल्या सचिनमध्ये? 

विक्रमांचा डोंगर रचणारा सचिन 

जागतिक क्रिकेट जगतामध्ये शतकांचं शतक करणाऱ्या सचिननं आता वयाची पन्नाशी गाठली आहे. सक्रिय क्रिकेटमधून तो निवृत्त झाला असला तरीही सध्या तो मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसत आहे. मास्टर ब्लास्टरचा मुलगा, अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) त्याचा वारसा क्रिकेट जगतात पुढे नेताना दिसत आहे. अशा या सचिनच्या अनेक खेळी क्रिकेटप्रेमींच्या आजही स्मरणात आहेत. 

हेसुद्धा वाचा : Happy Birthday Sachin : सचिनची ती अद्भूत खेळी, ज्यानंतर जगभरातील चाहत्यांसाठी बनला 'क्रिकेटचा देव'

 

ऑस्ट्रेलियाचे आक्रमक खेळाडू असो किंवा पाकिस्तानचा शोएब अख्तर असो. प्रत्येक गोलंदाजापुढे सचिनं फलंदाजीसाठी उभा असला की त्याला बाद करायचं कसं याचीच गणितं विरोधी संघातील खेळाडू करत होते. सचिन मात्र शांतपणे यायचा, अप्रतिम फटकेबाजी करायचा आणि मैदान गाजवून निघून जायचा.  कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट कट हे त्याचे हातखंड असणारे शॉट्स. तुम्हाला सचिनच्या फलंदाजीचा कोणता अंदाज आवडतो?