मुंबई : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare Trophy) कारनामा केला. ऋतुराजने महाराष्ट्रकडून खेळताना उत्तर प्रदेश (MAH vs UP) विरुद्ध शिवा सिंहच्या (Shiva Singh) ओव्हरमध्ये 6 नाही तर चक्क 7 सिक्स ठोकण्याचा कारनामा केला. ऋतराजने एका ओव्हरमध्ये चक्क 43 धावा कुटल्या. टीम इंडियाच्या युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) या 2 दिग्ग्जांनी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा विक्रम केला होता. मात्र ऋतुराज या दोघांच्या पुढे निघाला. ऋतुराजच्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅचने (Man Of The Match) गौरवण्यात आलं. मात्र इथेही ऋतुराजने मनाचा मोठेपणा दाखवत 5 विकेट्स घेणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरला सामनावीर पुरस्कार दिला. ऋतुराजच्या या वादळी खेळीदरम्यान सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हीडिओनुसार जेठालाल या काल्पनिक पात्राने 50 धावा केल्याचा दावा केला जात आहे. (ruturaj gaikwad hit 7 sixes an over after tmkoc jethalal 50 runs in single over runs old comedy video viral)
जेठालाल हे पात्र 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील आहे. या मालिकेतील एका भागात जेठालालने 50 धावा ठोकल्याचा दावा केला. एका ओव्हर मध्ये 50 धावा कशा केल्या? असं विचारल्यावर, एका ओव्हरमध्ये 2 नो बॉल टाकले होते यावरही मी सिक्स ठोकले होते, असं स्पष्टीकरण जेठालाल देतो. सध्या हा व्हीडिओ व्हायरल होतोय.
Leaked: Ruturaj Gaikwad’s mid-innings interview. pic.twitter.com/moj1Ip23qO
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) November 28, 2022
दरम्यान ऋतुराजने क्वार्टर फायनलमधील 49 व्या ओव्हरला 7 सिक्सचा कारनामा केला. शिवा सिंहने ओव्हरमधील 5 वा बॉल नो बॉल टाकला. ज्यामुळे ओव्हरमध्ये 6 ऐवजी 7 वेळा बॉल टाकावा लागला. ऋतुराज सलामीला आला होता तर नाबाद माघारी परतला. ऋतुराजने 159 बॉलमध्ये नाबाद 220 धावा केल्या यामध्ये 10चौकार आणि 16 षटकारांचा समावेश होता.