जोस बटलरने चाहत्यांसोबत शेअर केला सर्वात भावुक क्षण, पाहून डोळ्यात येईल पाणी

लाडाची ग प्रेमाची ग... बाबा दिसताच चिमुकली धावत येऊन बिलगली, जोस बटलरचा भावुक व्हिडीओ 

Updated: May 19, 2022, 09:57 AM IST
जोस बटलरने चाहत्यांसोबत शेअर केला सर्वात भावुक क्षण, पाहून डोळ्यात येईल पाणी title=

मुंबई : आयपीएल जगातील सर्वात मोठी लीग आहे. या लीगमध्ये जगभरातील खेळाडू खेळण्यासाठी येतात. सलग दोन महिने आयपीएलचे सामने सुरू आहेत. आता सामने शेवटच्या टप्प्यात आले आहेत. प्लेऑफसाठी सामने सुरू आहेत. 29 मेपर्यंत सामने पूर्ण होतील. 

कोरोनामुळे खेळाडूंना कडक बायोबबलमध्ये राहावं लागत आहे. त्यामुळे खेळाडूंना सतत प्रवास करणं शक्य होत नाही. राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू जोस बटलरने एक भावुक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात एक क्षण पाणी येईल. 

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की जोस बटलर भिंती मागे लपून चिमुकलीला बघत आहे. चिमुकली त्याला बघते आणि त्याच्याकडे धावत येते आणि बिलगते. चिमुकली आणि बाबाची झालेली ही प्रेमळ भेट खूपच भावुक करणारी आहे. 

ही भेट अनेक महिन्यांनी झाली. चिमुकलीचा आनंद गगनात मावत नव्हता. ती आपल्या बाबाला घट्ट बिलगली. जोसने तिला उचलून घेतलं आणि प्रेमाने बिलगला.

जोसची पत्नी लुसी देखील त्याला भेटताना दिसली. हा भावुक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये आल्यानंतर जोसची मुलगी सगळ्यांची फेरवरेट झाली आहे. मैदानावर ती बॉल टाकतानाही दिसत आहे.