RCB ला ती एक चूक पडली महागात, गमावली IPL 2022 ची ट्रॉफी

IPL मध्ये 4 वेळा ट्रॉफी जिंकवणाऱ्या खेळाडूला टीम बाहेर बसवणं RCB ला पडलं महागात, गमावली ट्रॉफी

Updated: May 28, 2022, 03:32 PM IST
RCB ला ती एक चूक पडली महागात, गमावली IPL 2022 ची ट्रॉफी title=

मुंबई : बंगळुरू टीम प्लेऑफपर्यंत पोहोचली मात्र थोडक्यासाठी शेवटी फायनलमध्ये पोहोचणं मात्र जमलं नाही. गेल्याही वर्षी बंगळुरूसोबत असाच प्रकार घडला. यंदाच्या हंगामात बंगळुरू फायनलपर्यंत पोहोचल असं सगळ्यांना वाटलं होतं मात्र गडबड झाली. 

बंगळुरू टीमने एकूण 16 सामने खेळले त्यापैकी 9 जिंकले आणि 7 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या सगळ्या सामन्यांमध्ये एक असा खेळाडू होता ज्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची बंगळुरू मॅनेजमेंटने संधीच दिली नाही. 

हा खेळाडूचा याआधीच्या हंगामात 4 वेळा आयपीएलची ट्रॉफी मिळवून हातभार होता. मात्र आता बंगळुरूने या खेळाडूला संधी दिली नाही. हा खेळाडू पंधराव्या हंगामात पूर्णवेळ बेंचवर बसून होता. 

बंगळुरूने ऑक्शनमध्ये स्पिनर कर्ण शर्माला आपल्या टीममध्ये घेतलं. 2009 पासून तो आयपीएलचा भाग आहे. यंदाच्या मोसमात त्याला एकही सामना खेळण्याची संधी बंगळुरूने दिली नाही. 

बंगळुरूने संपूर्ण आयपीएल कर्ण शर्माला संपूर्ण हंगामासाठी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवलं. कर्ण शर्मा त्याच्या उत्कृष्ट बॉलिंगसाठी ओळखला जातो. तो आतापर्यंत ज्या संघाचा भाग होता, त्या त्यावेळी टीमला ट्रॉफी मिळाली होती. यंदा त्याला बंगळुरूने आपल्या टीममध्ये घेतलं पण संधी दिली नाही. 

कर्ण शर्माने वेगवेगळ्या टीममध्ये खेळून 4 ट्रॉफी टीमला जिंकवून दिल्या आहेत. 2016 मध्ये हैदराबादमधून खेळला होता तेव्हा त्या टीमने ट्रॉफी जिंकली होती. 2017 ला मुंबई टीममधून खेळला त्यावेळी मुंबईने ट्रॉफी जिंकली. चेन्नईसोबतही तो खेळला आहे. मात्र बंगळुरूने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही सामना खेळण्याची संधी दिली नाही. 

कर्ण शर्माने आयपीएलमध्ये 68 सामने खेळून 59 विकेट्स घेतल्या आहेत. त्यासोबत 2 वन डे आणि एक टी 20 सामना खेळला आहे. त्याने यापूर्वी 2005 मध्ये रेल्वेमध्ये नोकरी केली होती. पटरीची काळजी घेणं आणि लोखंडी रॉड उचलण्याची कामंही त्याने केली आहेत. 

2014 च्या हंगामात आयपीएलमध्ये हैदराबादकडून त्याला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली. यामुळे त्याचं नशीब पालटलं आणि करोडपती बनला. बंगळुरूने त्याला खेळण्याची संधी दिली असती तर आज फायनलमध्ये बंगळुरू टीम असती असं काही चाहत्यांनी म्हटलं आहे.