Rohit Sharma : आयपीएलमध्ये गुरुवारी पंजाब किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 9 रन्सने पंजाबचा पराभव केला. मुंबईने पंजाबला 193 रन्सचं आव्हान दिलं होतं. पहिल्यांदा फलंदाजी करत मुंबईच्या टीमने एक चांगला स्कोर उभा केला. दरम्यान यावेळी मुंबईच्या टीमचा माजी कर्णधार रोहित शर्मासोबत एक घटना घडली. एकाच डावात रोहित शर्माला दोन वेळा आऊट करार देण्यात आला.
मुंबईच्या डावात पाचव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर हर्षल पटेलने स्लो यॉर्कर टाकत रोहित शर्माला आऊट केलं. यावेळी क्रीजपासून दूर फेकलेला बॉल रोहितच्या पुढच्या पायाला लागला. मुख्य म्हणजे यावेळी अंपायरने एलबीडब्ल्यूच्या अपीलवर बोट उचलून आऊट करार दिला. मात्र यानंतर सूर्यकुमार यादवने आग्रह केल्यानंतर रोहितने DRS घेतला.
यावेळी बॉल लेग साईडच्या बाहेर जाणार का, हाच प्रश्न होता. बॉल ट्रॅकिंगच्या माध्यमातून असं दिसलं की, बॉल लेग स्टंपला लागत नव्हता आणि यामुळे रोहित वाचला. रोहित शर्मा नाबाद आहे यावर पंजाब टीमचा विश्वास बसत नव्हता. परंतु 11 बॉल्समध्ये 17 रन्स केल्यानंतर रोहितला या जीवदानाचा फायदा घेता आला नाही. अखेर आणि 25 बॉल्समध्ये 36 रन्स केल्यानंतर तो रोहित शर्मा पुन्हा बाद झाला.
आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात पंजाबने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिसऱ्याच ओव्हरमध्ये कागिसो रबाडाने इशान किशनला आऊट केलं. यानंतर रोहित शर्माही दोन ओव्हरनंतर बाद झाला असता परंतु त्याला जीवनदान मिळालं. जीवदान मिळाल्यानंतर रोहित शर्माने खेळण्याचा वेग कमी केला. मात्र दुसरीकडे सूर्यकुमार यादवने मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. सूर्याने सिझनमधील दुसरं अर्धशतक अवघ्या 34 बॉल्समध्ये पूर्ण केले.
पंजाब किंग्जचा पराभव करत मुंबई इंडियन्सने पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. मुंबई 9 व्या स्थानावरून आता 7 व्या स्थानी उडी मारलीये. मुंबईकडे 6 अंक आणि -0.133 चा नेट रननेट आहे. तर गुजरातचा संघ 8 व्या स्थानी आहे. तसेच पराभवानंतर देखील पंजाबचा संघ 9 व्या स्थानी कायम आहे. पंजाबच्या खात्यात -0.255 नेट रननेट आहे. तर पाईंट्स टेबलच्या बॉटमवर आरसीबीचा संघ केवळ 2 अंकासह आहे.